मेडल काय मोदींनी जिंकून आणलंय का?; बॅनर पाहून ऑलिम्पिक पदक विजेत्यानेही व्यक्त केली नाराजी
यंदाच्या टोक्यो आलिम्पिकमध्ये भारताने दमदार प्रदर्शन करत चांगल्य कामगिरी करणाऱ्या देशांच्या यादीत स्थान पटकावले आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, कांस्य पदक विजेता बजरंग पुनिया यांच्यासोबतच भारतीय ऑलिम्पिक पथक नवी दिल्लीत परतले आहे.
नवी दिल्लीच्या अशोका हॉटेलमध्ये ऑलिम्पिक विजेत्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, माजी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू , केंद्रीय राज्य क्रीडामंत्री निशित प्रामाणिक उपस्थित होते. पण यामध्ये सगळ्यात जास्त चर्चेत या ठिकाणी लावण्यात आलेला बॅनर चर्चेत आला आहे.
या बॅनरवर पदक विजेत्यांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो मोठा लावल्याने अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंहेही यावर प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे.
विजेंदर सिंहने मंचावरील एक फोटो शेअर केला आहे. तसेच त्याच्या कॅप्शनमध्ये सर्व गोष्टी पीआरचा भाग आहे आणि पीआरच सर्वकाही आहे, असे लिहिले आहे. विजेंदर सिंहने असे म्हणत नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.
तसेच काँग्रेसनेही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पदक मोदीजींनी जिंकून आणलं आहे?, असे ट्विट भारतीय युवा काँग्रेसचे नेते अध्यक्ष श्रीनिवास बी व्ही यांनी मोदींना टोला लगावला आहे.
सध्या सोशल मीडियावर हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मोदींऐवजी खेळाडूंचा फोटो अजून मोठ्या आकाराचे असायला हवे होते, असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.
Everything is PR PR is everything pic.twitter.com/zO6IQjkdkL
— Vijender Singh (@boxervijender) August 9, 2021
मेडल मोदी जी जीतकर लाये है? pic.twitter.com/taUykaLCuU
— Srinivas B V (@srinivasiyc) August 9, 2021
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: राखी सावंतची भालाफेक दुसऱ्यावरच बेतली; भालाफेकीची नादात फोडलं एकाचं डोकं
पोलिसांच्या कारवाईला घाबरली लखनऊ गर्ल; म्हणाली, मला माझं करीयर….
कोकणात आपत्ती आलीये आता शाहरुख खान सलमान खान कुठेय?- अभिनेत्री दिपाली सय्यद
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: