‘१०० कोटींची वसुली करून स्वतःचे खिसे भरता मग या गणेश मंडळांनी काय करावे?’

August 05, 2021 , 0 Comments

मुंबई । कोरोनामुळे राज्यात अजूनही नियम लागू आहेत. अनेक सण, उत्सव साजरे करताना त्याला बंधने लावण्यात आले आहेत. आता येणारा गणेशोत्सव साजरा करताना देखील नियमांचे पालन करावे लागणार आहे. यामुळे विरोधक सरकारवर टीका करत आहेत.

या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. नितेश राणे यांनी ट्विट करून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, गणेश मंडळे आर्थिक संकटात असताना स्वागत कमानी त्यांच्या उत्पनाचे साधन आहे.

या स्वागत कमानीमुळे कोरोना पसरतो असे कुठल्या मुन्ना भाई MBBS नी या ठाकरे सरकारला सांगितले आहे?? १०० कोटींची वसुली करून स्वतःचे खिसे भरता मग या मंडळांनी काय करावे ? असे म्हणत त्यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मग यांच्या वाढदिवसाचे फलक कसे लागतात??

असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. यावर्षी कोरोनाची दुसरी लाट आली. यामध्ये अनेकांचे मृत्यू झाले. रुग्णसंख्या इतकी वाढली की अनेकांना रुग्णालयात बेड देखील उपलब्ध होत नव्हते. यामुळे अनेकांचे हाल झाले.

असे असताना आता तिसरी लाट देखील येणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे अजूनही काळजी घ्यावी लागणार आहे. यामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. यामुळे मात्र अनेकांनी नाराजी व्यक्त करत सरकारवर टीका केली आहे.

ताज्या बातम्या

छत्रपती शिवरायांनी आपल्यातील जाणकार मंडळी जपानमध्ये का पाठवली नाही?- बाबासाहेब पुरंदरे

डिजिटल कंपनीत नोकरीची संधी, १० हजार जणांची होणार भरती, मिळणार आकर्षक पगार..

बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली खंत; म्हणाले, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यातील..


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: