स्वत:च्या वहिनीवर अ‍ॅसिड फेकायला कुणी सांगितलं?, राणेंनी दिला हा इशारा

August 28, 2021 0 Comments

रत्नागिरी: केंद्रीय मंत्री यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा पुढचा प्रवास आजपासून रत्नागिरीतून सुरू झाला. यावेळी राणे यांनी पुन्हा एकदा नेतृत्वाला आणि राज्य सरकारला आव्हान दिलं. 'मी ३९ वर्षे शिवसेनेत होतो. त्यामुळे मला बऱ्याच गोष्टी माहीत आहेत', असे नमूद करत राणे यांनी सूचक शब्दांत इशारा दिला. ( ) वाचा: नारायण राणेला धमक्या देण्याचा प्रयत्न करू नका. माझ्याकडे तुमच्याबाबत भरपूर मसाला आहे, असे सांगताना राणे यांनी गंभीर विधान केलं. 'स्वत:च्या भावाच्या पत्नीवर म्हणजेच वहिनीवर अ‍ॅसिड फेकायला कुणी सांगितलं, कुणाला सांगितलं?, हे मला माहीत आहे. हे सगळं मी एकेक करून बाहेर काढणार आहे. माझा घसा एकदा बरा होऊ दे. मग यांना मी सोडणार नाही. मी खणखणीत वाजणार. तुम्हाला काय करायचं ते करा', असे सांगत राणे यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या. माझ्या जुन्या गोष्टी काढणार असे म्हणाले. दोन वर्षे झाली शोधताहेत पण त्यांना काही मिळालं नाही, असे नमूद करताना आता मी जुन्या गोष्टी बाहेर काढणार आहे. रमेश मोरेची हत्या कशी झाली?, त्यामागे काय कारण होतं? जया जाधव यांची हत्या कशातून झाली? हे सगळं मला माहीत आहे आणि ते मी लवकरच बाहेर काढणार आहे, असा इशारा राणे यांनी दिला. मृत्यू आणि दिशा सालियन या केस संपलेल्या नाहीत. मी केंद्रामध्ये मंत्री आहे, याची आठवण ठेवा, असेही राणे पुढे म्हणाले. वाचा: यांना थेट इशारा मुख्यमंत्री यांच्याबद्दल नारायण राणे यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने शिवसैनिक आक्रमक झाले होते. मुंबईत राणे यांच्या बंगल्यावर शिवसैनिकांनी युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. त्यावर राणे यांनी धमकीवजा इशारा दिला. आमच्या घरासमोर कोण तो वरुण सरदेसाई...वरून खाली आला. घरावर हल्ल्याचा प्रयत्न करूनही त्याला अटक करण्यात आली नाही. यांचा नातलग आहे ना तो...म्हणून एवढी वट पण ज्यांना पोलीस बंदोबस्त नव्हता त्यांनी मार खाल्ला, असे सांगताना यापुढे माझ्या घरावर चाल करून आलात तर परत जाणार नाहीत. तुम्हाला आम्ही सोडणार नाही, इतकं लक्षात ठेवा, असा इशारा राणे यांनी दिला. आगामी निवडणुकीत सगळे आमदार खासदार आपले हवेत. शिवसेना कुठे औषधालाही सापडता कामा नये, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे, असे आवाहनही राणे यांनी कार्यकर्त्यांना केले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: