राड्यानंतर ठाकरे-फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा!; नेमकं काय ठरलं?

August 28, 2021 0 Comments

मुंबई: मुख्यमंत्री व पक्षप्रमुख यांच्याबद्दल जन आशीर्वाद यात्रेदरम्यान आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात केंद्रीय मंत्री यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याने शिवसेना आणि भाजपमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला. हा तणाव अजून पूर्णपणे निवळलेला नसताना सह्याद्री अतिथीगृह येथे आज वेगळंच चित्र पाहायला मिळालं. (CM ) वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विरोधी पक्षनेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हेही उपस्थित होते. या बैठकीसोबतच सह्याद्री अतिथीगृहावर आणखीही महत्त्वाच्या घडामोडी पाहायला मिळाल्या. त्यात सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली ती मुख्यमंत्री ठाकरे आणि विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यात बंद दाराआड झालेली चर्चा. नारायण राणे यांच्यावरील अटकेच्या कारवाईने शिवसेना आणि भाजपमधील तणाव प्रचंड वाढला आहे. राणे यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर काहीसा तणाव निवळताना दिसत असला तरी राणे यांचे बेछूट आरोप अजूनही थांबलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर ठाकरे-फडणवीस भेट महत्त्वाची ठरली आहे. वाचा: सह्याद्रीवर नेमकं काय घडलं? सर्वपक्षीय बैठक संपल्यानंतर प्रथम मुख्यमंत्री ठाकरे, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांची साधारण दहा मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर दरेकर तिथून निघाले व उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यात १५ मिनिटं चर्चा झाली, अशी माहिती मिळत आहे. या चर्चेचा तपशील मिळाला नसला तरी शिवसेना-भाजपमधील तणाव या मुद्द्यावर ही चर्चा झाल्याची अधिक शक्यता आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दोन्ही बाजूकडून संयम बाळगला गेला पाहिजे, यावरही नेते बोलल्याचे सांगितले जात आहे. बैठकीत नारायण राणे यांच्याबाबत चर्चा झाली किंवा नाही, याबाबत कोणतीच माहिती मिळालेली नाही. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: