हा चर्च साधा नाही, त्याला अफगाणमध्ये लढलेल्या मराठा सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलय..
मुंबईत अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत ज्यांचा इतिहास हा आताच्या घडीला जास्त महत्वाचा आहे, मुंबईतल्या अशाच एका ऐतिहासिक वास्तूबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर हि वस्तू आहे मुंबईतल्या कुलाबाची शान असणारा उंची आणि आश्चर्यकारक असा, सुंदर गॉथिक पद्धतीची रचना असलेला १८६५ चा अफगाणिस्तान चर्च.
वेगवेगळ्या वास्तुकला आणि त्याच्यामागे असलेल्या इंटरेस्टिंग कथा हे या अफगाणिस्थान चर्चचे वैशिष्ट्य आहे. दक्षिण मुंबईची तोंडओळख म्हणून या चर्चची निवड केली जाते. चर्च ऑफ सेंट जॉन द इव्हेंजलिस्ट म्हणूनसुद्धा हे चर्च ओळखलं जातं. हे अँग्लिकन चर्च पूर्वीच्या एका छोट्या चॅपलच्या आधी त्याच्या मूळ स्थानापासून एक किलोमीटर दक्षिणेला होतं.
पण तत्कालीन सरकारने नवीन चर्च उभारण्यासाठी जमिनीचा एक तुकडा नियुक्त केला जो जवळच्या बंदरातील जहाजांसाठी उपयुक्त खुणा आणि दिशा दाखवण्यासाठी उपयुक्त ठरेल. या चर्चचा इतिहाससुद्धा मोठा रंजक आहे.
पहिल्या अँग्लो-अफगाण युद्धात मरण पावलेल्या हजारो सैनिकांचे स्मारक बांधण्याची गरज आणि नंतर १८४२ मध्ये काबूलमधून माघार घेण्याची गरज लक्षात घेऊन या चर्चचे बांधकाम शेवटी १८४० मध्ये सुरु करण्यात आले. १८३९ ते १८४२ दरम्यान हे युद्ध झाले, हे युद्ध ब्रिटिशांनी अफगाणिस्थानवर अतिक्रमण करण्याचा एक विनाशकारी प्रयत्न म्हणून केलं होतं.
या युद्धात ४५०० सैनिकांपैकी एक आणि त्यांच्या छावणीतील १२ हजार अनुयायांव्यतिरिक्त इतर सर्वानी आपला जीव गमावला. सैन्यातील सहायक सर्जन विल्यम ब्रायडन हे ब्रिटिशांच्या बाजूने जिवंत राहणारे एकमेव व्यक्ती ठरले. हे एक मोठं विध्वंसक युद्ध ठरलं, मोठी जीवितहानी या युद्धात झाली. ब्रिटिशांवर या विनाशकारी हल्यांमुळे जगभरातून टीका झाली होती.
ब्रिटिश बाजूने पहिल्या अँग्लो-अफगाण युद्धात लढलेले आणि मरण पावलेले बरेच सैनिक पूना हॉर्सचे मराठा होते आणि ते मुंबईचे होते. या कारणांमुळे मुंबईत या मराठा सैनिकांच्या समरणार्थ स्मारक बांधण्याचं काम सुरु झालं.
इंग्रजी नागरी इंजिनिअर आणि गॉथिक पुनरुज्जीवन आर्किटेक हेन्री कोंबीयर यांनी डिझाईनचं काम हाती घेतलं. इमारतीचा पाया १८४७ मध्ये मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर जॉर्ज रसेल क्लार्क यांनी घातला.
१८६५ मध्ये शेवटी हे चर्च पूर्ण झालं. चर्चच्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील खिडक्यांचे डिझाईन करण्यासाठी स्टेन ग्लास तज्ञ् विल्यम वेल्स यांना आवर्जून बोलावण्यात आलं होतं. तर आर्किटेक्ट विल्यम बटरफिल्ड यांनी अफगाण युद्ध स्मारक मोझेकचं डिझाईन केलं होतं.
भव्य दिव्य वेगळ्या रुंद गॉथिक पद्धतीच्या कमानी, उत्तम डिझाईन केलेल्या खिडक्या आणि ६० मीटर उंच टॉवर आणि शिखर असलेले हे भव्य चर्च आज मुंबईच्या दक्षिण टोकाकडे नेव्ही नगरमध्ये आहे आणि यावर भारतीय नौदलाचा हक्क आहे.
साप्ताहिक सेवेत हे चर्च आहे आणि इतकं मोठं वास्तुशिल्पं असलेलं हे चर्च देशातील आणि विदेशातील पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण बनलेलं आहे. अफगाणिस्थानमध्ये झालेल्या युद्धात मराठा सैनिकांच्या स्मरणार्थ हे चर्च उभारण्यात आलं हे या चर्चचं वैशिष्ट्य आहे. आजही देशविदेशातून अनेक पर्यटक या चर्चला भेट देतात आणि इथला इतिहास जाणून घेतात.
हे हि वाच भिडू :
- प्रिन्स चार्ल्सला किस केल्याने पद्मिनी कोल्हापुरे ब्रिटनमध्येसुद्धा चर्चेत आल्या होत्या….
- जगातला सर्वात क्रूर प्रयोग रशियाने केलाय कि नाही याच्या चर्चा आजही सुरु असतात..
- तामिळनाडू आत्ता चर्चा करतायेत पण पंढरपुरच्या मंदिरात २०१४ पासूनच महिला पुजारी नेमल्या आहेत
- २० वर्षात अमेरिकेने ६१ लाख कोटी खर्च केले, पण अफगाणिस्तान पुन्हा तालिबान्यांच्या हातात गेले
The post हा चर्च साधा नाही, त्याला अफगाणमध्ये लढलेल्या मराठा सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलय.. appeared first on BolBhidu.com.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: