मोठी बातमी! भाजपमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता, प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ नेत्याची वर्णी लागणार
नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून राज्यातील भाजप नेते हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यामुळे राज्यात काही फेरबदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्रासाठी नवीन प्रदेशाध्यक्ष निवडला जाणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. यासाठी भाजपचे नेते दिल्लीत आहेत.
असे असताना बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदचे आमदार डॅा. संजय कुटे यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. यासाठी आशिष शेलारही इच्छुक आहेत. मात्र फडणवीस कोणाला पसंती देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संजय कुटे हे ओबीसी चेहरा आहेत. ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील वातावरण तापले आहे.
संजय कुटे हे फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. असे असताना ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांनी फडणवीसांच्या विरोधात एल्गार केला आहे. त्यामुळे कुटे यांचे नाव फडणवीसांनी पुढे केल्याचे समजते. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दिल्ली दौऱ्यावर होते. त्यांना केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांची भेट मिळाली नाही. त्यातच देवेंद्र फडणवीस आणि आमदार आशिष शेलार यांनी शहा यांची भेट घेतली होती. चंद्रकांत पाटील यांना भेट मिळाली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सध्या बावनकुळे आणि पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहेत. त्यांना पक्षाने डावलले असल्याचे बोलले जाते. यामुळे आता जर प्रदेशाध्यक्षपद दुसऱ्या नेत्याला दिले तर ते पुन्हा नाराज होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ताज्या बातम्या
नीरज चोप्राची नक्कल राखी सावंतला पडली महागात, रस्त्यात भालाफेक करुन फोडलं एकाचं डोकं; पहा व्हिडिओ
‘राष्ट्रीय समाज पक्षाचे पन्नास आमदार निवडून द्या, मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करतो’
काय सांगता! ऑलिम्पिकमध्ये आता क्रिकेटाचाही समावेश होणार; आयसीसीने केली घोषणा
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: