शेगावच्या गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांची प्राणज्योत मालवली

August 05, 2021 , 0 Comments

बुलडाणा । गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले संत गजानन महाराज शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन झाले आहे. घरीच त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, शिवशंकरभाऊ यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. यामुळे सर्वांना एकच धक्का बसला.

त्यांच्या निधनाची वार्ता समजताच सर्व स्तरातून त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. अनेक बड्या नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सर्वांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग होता.

त्यांनी संत गजानन महाराज यांची बराच काळ सेवा केली होती. त्यांनी समाजकार्यात स्वताला वाहून दिले होते. त्यांनी अनेकांना मोठी मदत केली होती. यामुळे ते सर्वांना परिचित होते. त्यांनी आयुष्यभर सामाजिक कार्याचा वसा अव्याहतपणे संभाळला आहे.

त्यांनी गरजू लोक आणि आदिवासी लोकांच्या हितासाठी मोलाचे काम केले आहे. यामुळे त्यांच्या जाण्याने एक मोठी हानी झाली आहे. शिवशंकरभाई पाटील यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम त्यांच्या घराशेजारी असणाऱ्या शेतात करण्यात येणार आहे.

यावेळी कोणीही गर्दी करु नये. तसेच मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यात येईल, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे. ते आजारी असताना त्यांनी दवाखान्यात घेऊन जाऊ नका असे सांगितले होते. यामुळे घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते.

त्यांनी आयुष्यभर आयुर्वेदिक उपचाराला प्राधान्य दिले होते. यामुळे त्यांनी दवाखान्यात जाण्यास नकार दिला होता. मात्र त्यांचे आता निधन झाले आहे. त्यांच्या अंत्यविधीला बडे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांच्या घरी सुरक्षा वाढवली आहे.

ताज्या बातम्या

अनवाणी पायाने शाळेत जाताना ज्या कारचे स्वप्न पाहिले, आज त्याच कंपनीत आहे सॉफ्टवेअर इंजिनिअर; वाचा मनाला भिडणारी कहाणी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा, आत्महत्येपूर्वी तिने केले होते ‘हे’ काम

प्रियांका अमेरिकेत विकतेय ‘मुंबईचा वडापाव’, किंमत ऐकून डोळे होतील पांढरे..


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: