मंदीरे उघडा नाहीतर संपूर्ण राज्यात जेलभरो आंदोलन; अण्णा हजारेंची सरकारला १० दिवसांची मुदत

August 29, 2021 , 0 Comments

समाजसेवक अण्णा हजारे यांनी महाराष्ट्र सरकारला इशारा दिला आहे की, जर राज्यात मंदिरे उघडली गेली नाहीत तर सार्वजनिक आंदोलन करू. “जर बार उघडता येतात, तर मंदिरे का नाही?” असा प्रश्न त्यांनी राज्य सरकारपुढे उपस्थित केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली होती. परंतु आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना महाराष्ट्र सरकारने अद्याप धार्मिक स्थळे लोकांसाठी उघडण्याची परवानगी दिलेली नाही.

सरकार मंदिर का उघडत नाहीत? मंदिरांपासून काय धोका आहे सरकारला? दारूच्या दुकानामध्ये एवढी गर्दी असताना तिथे कोरोना संसर्ग होत नाही का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

अण्णा हजारे पुढे ते म्हणाले, “दारूची दुकाने हॉटेल्स सर्व उघडी केली असताना तिथे होणाऱ्या गर्दीपासून कोरोनाचा संसर्ग वाढत नाही का? ज्या मंदिरातून सात्विक विचार निर्माण होतात ती मंदिर उघडत नाहीत? अशा मंदिरांना बंद करून सरकारला काय भेटलं? असे थेट सवाल त्यांनी राज्यातील सरकारला केले आहेत.

मी आज जे काही आहे ते केवळ मंदिरामधून मिळालेल्या संस्कारांमुळेच आहे. संतांचे विचार देणारे मंदिर का बंद केली. सरकारला संतांचे विचार काय समजले? मंदिर उघडण्याची मागणी मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

दरम्यान १० दिवसांआधी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी पक्षावर मंदिर खुली का करण्यात येत नाही असा सवाल केला होता. भाजपचे कार्यकर्ते राम कदम म्हणाले होते की, मंदिर पुन्हा उघडू न देण्याचा निर्णय हा “हिंदूंचा आवाज दाबण्यासारखा” आहे.

 

महत्वाच्या बातम्या
आता आपल्या गाडीच्या नंबर प्लेटमध्ये होणार मोठा बदल, MH काढून BH येणार; होणार ‘हे’ फायदे
सेलिब्रीटींचे ते १० खाजगी फोटो जे झाले होते व्हायरल; प्रिती झिंटा आणि करीना कपूरचा तर न्युड व्हिडिओ…
VIDEO: मुलाने धूमधडाक्यात लावले आपल्या आईचे लग्न; होणाऱ्या वडिलांना म्हणाला, आईला किस करा…
मलायका आणि अर्जूनच्या नात्यावर कपूर कुटूंब नाराज?; अनिल कपूरनेच केला मोठा खुलासा

 


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: