coronavirus latest update करोना: राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत घट, मात्र मृत्युसंख्या चिंता वाढवणारी

July 25, 2021 0 Comments

मुंबई: राज्यात बाधितांची संख्या स्थिरावून ती काहीशी घटत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. तसेच बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे. एकीकडे असे दिलासादायक चित्र असले तरी दैनंदिन मृत्यूची संख्या मात्र तितकीशी घसरताना दिसत नाही. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत एकूण ६ हजार २६९ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. या बरोबरच आज एकूण ७ हजार ३३२ इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, आज दिवसभरात एकूण २२४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या २२४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६० लाख २९ हजार ८१७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३५ टक्के एवढे झाले आहे. क्लिक करा आणि वाचा- सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या खाली आली असून ती ९३ हजार ४७९ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १५ हजार ७१४ इतका आहे. तर, पुण्याच्या खालोखाल कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ११ हजार ६८२ इतके रुग्ण आहेत. तर, त्यानंतर ठाणे जिल्ह्यात ११ हजार ३०४ रुग्ण सक्रिय आहेत. सांगलीत ही संख्या १० हजार ६१९ इतकी आहे. तर, मुंबई महापालिका हद्दीत सध्या ८ हजार ३१३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. साताऱ्यात ही संख्या ७ हजार २९६, अहमदनगरमध्ये ४ हजार ९९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, रायगडमध्ये २ हजार ५४८, रत्नागिरीत २ हजार ४८९, सिंधुदुर्गात २ हजार ३७२, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार १३७ इतकी आहे. तर, नागपूर जिल्ह्यात ही संख्या १ हजार ७०८ इतकी झाली आहे. क्लिक करा आणि वाचा- यवतमाळमध्ये फक्त ९ सक्रिय रुग्ण या बरोबरच, औरंगाबादमध्ये ६१३, नांदेडमध्ये ही संख्या ४४४ इतकी आहे. जळगावमध्ये ५१९, तसेच अमरावतीत ही संख्या १३१ इतकी आहे. आज राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या यवतमाळ जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ९ वर आली आहे. क्लिक करा आणि वाचा- ५,२७,७५४ व्यक्ती होम क्वारंटाइन आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ६६ लाख ४४ हजार ४४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२ लाख ५८ हजार ०७९ (१३.४२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख २७ हजार ७५४ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ३ हजार ६२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: