coronavirus in thane updates करोना: ठाण्यात आज ९७ नव्या रुग्णांचे निदान, तर ३ मृत्यू
ठाणे: ठाणे शहरात कालच्या तुलनेच नव्या बाधित रुग्णांच्या संख्येत किंचितशी घट झाल्याचे दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये ठाण्यात ९७ इतक्या नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या १०० इतकी होती. तर, आज दिवसभरात १०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आज दिवसभरात एकूण ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या बरोबर आतापर्यंत एकूण २ हजार ०२३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. ठाण्यात ज्यांवर उपचार सुरू आहेत अशा सक्रिय रुग्णांची संख्या ९७३ इतकी आहे. ठाणे महानगरपालिकेने ही माहिती दिली आहे. ( thane registered 97 new covid cases with 100 patients recovered and 3 deaths) ठाणे शहराचा रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७.७६ टक्क्यांवरच असून रुग्णदुपटीचा कालावधी तब्बल १ हजार ६६ दिवसांवर गेला आहे. ठाण्यात आज करोनाच्या २ हजार ६८४ चाचण्या करण्यात आल्या. क्लिक करा आणि वाचा- ठाणे शहरात आतापर्यंत एकूण १ लाख ३३ हजार ८२७ जणांना करोनाची लागण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत एकूण १ लाख ३० हजार ८३१ रुग्ण बरे झाले आहेत. ठाण्यात आतापर्यंत एकूण १७ लाख ५३ हजार ६६४ इतक्या चाचण्या करण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेने दिली आहे. क्लिक करा आणि वाचा- ठाण्यातील करोनाची आजची स्थिती २४ तासांत बाधित रुग्ण - ९७ २४ तासांत बरे झालेले रुग्ण - १०४ बरे झालेले एकूण रुग्ण - १.३०,८३१ बरे झालेल्या रुग्णांचा दर - ९७.७६% एकूण सक्रिय रुग्ण- ९७३ रुग्ण दुप्पटीचा दर- १,०६६ दिवस कोविड वाढीचा दर ( आठवडाभराचा)- ०.०७ % क्लिक करा आणि वाचा-
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: