ज्या पोलीसांनी बंडातात्यांना बेड्या घातल्या त्याच बंडातात्यांनी पोलीसांना स्वताच्या हाताने जेऊ घातले…
पुणे । गेल्या काही दिवसांपासून पालखी सोहळ्यावरून वाद निर्माण झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही वारी साध्या पद्धतीने होणार आहे. याबाबत पंढरपूरला पायी वारीने जाण्यासाठी निघालेल्या किर्तनकार बंडातात्या कऱ्हाडकर व सहकाऱ्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना करवडी येथील श्रीकृष्ण गोपालन केंद्रात आणून स्थानबध्द केले.
असे असताना बंडातात्यांनी स्वयंपाक करुन तेथे बंदोबस्तास असलेल्या पोलिसांना व सहकाऱ्यांना जेवण घातले. त्यांच्या या शिष्टाईने पोलिसही भारावून गेले. बंडातात्या कऱ्हाडकर यांना शनिवारी पुणे पोलिसांनी आणून येथली करवडी येथील गोपालन केंद्रात आणून सोडले आहे.
तेथे पहिल्या दिवशी शनिवारी पोलिस उपाधीक्षक रणजित पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी बंडातात्यांबरोबर जेवण केले. तर बंडातात्यांनी स्वतः केलेल्या जेवणाचा कऱ्हाड तालुका पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी आस्वाद घेतला. यामुळे चर्चा सुरू झाल्या.
ते म्हणाले, मला आणि पांडुरंग घुले महाराज यांना ताब्यात घेवून स्थानबद्द केले आहे. वारीपेक्षा ज्ञानोबाराय, तुकोबाराय यांची पायी पालखी वारी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. वारकरी सांप्रदायाचा पाईक म्हणून महान संताच्या पालख्यांना केलेला विरोध शासनाला महाग पडेल.
यामुळे पोलिसांनी गोपालन केंद्र पसिसरात बंदोबस्त ठेवला होता. बंडातात्यांनी पहाटेचे श्रमदान, पूजा व धार्मिक विढी आटोपला. त्यानंतर त्यांनी स्वतः भाकरी, आमटी, भाजी करुन तेथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना व सहकाऱ्यांना जेवण घातले. त्यांच्या या बांधिलकीमुळे पोलिसही भारावून गेले.
यावर सुरुवातीलाचा पालकमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली होती. कोरोनामुळे यावर्षी देखील साध्या पद्धतीने पालखी सोहळा होणार आहे. मात्र याला अनेक वारकऱ्यांनी मोठा विरोध केला. यामुळे वातावरण तापले.
ताज्या बातम्या
राज्यात शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार? पण ‘हा’आहे अडथळा
तुम्ही मुलांचे गाणं ऐकून काय केले असते? हाताची घडी घालून बसला असतात का?’ मृण्मयीने ट्रोलर्सला उत्तर
मोठी बातमी! विरोधकांना धक्काबुक्की करणं पडलं महाग, भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: