मोठी बातमी! वादळाचा तडाख्याने विठ्ठलाची ५१ फुटी मूर्ती कोसळली

July 26, 2021 , 0 Comments

जालना । गेल्या दोन दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस पडत आहे. कोकणात अनेक ठिकाणी दरड कोसळून अनेकांचे मृत्यू झाले आहेत. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे हे एक मोठे संकट राज्यावर आले आहे. यामुळे आता नागरिक मदतीची मागणी करत आहेत.

असे असताना आता जालन्यात देखील जोरदार वादळी वाऱ्यामुळे ५१ फुटी विठ्ठलाची मूर्ती कोसळली आहे. वाटूर फाटा येथील आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रात ५१ फूट उंच विठ्ठलाची मूर्ती उभारण्यात आली होती. अनेक नागरिक याठिकाणी येत असत.

वादळाचा तडाखा या विठ्ठलाच्या मूर्तीला बसला. वादळी वाऱ्याचा वेग इतका होता की, त्यामुळे विठ्ठलाची मूर्ती समोरच्या बाजूला झुकन खाली आली. यावेळी याठिकाणी कोण नव्हते यामुळे कोणीही जखमी झाले नाही. मात्र मूर्तीचे मोठे नुकसान झाले आहे.

ही ५१ फूट उंच विठ्ठलाची मूर्ती सर्वांना आकर्षित करणारी होती. अनेकजण भक्तीभावाने या परिसरात गर्दी करत. अनेकजण याठिकाणी भेट देत होते. आता मात्र वादळी वाऱ्यामुळे मूर्ती कोसळल्यामुळे भाविकांनी हळहळ व्यक्त केली आहे. पुन्हा लवकर ही मूर्ती पूर्वरत करण्याची मागणी अनेकजण करत आहेत.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. ही एक नैसर्गिक आपत्ती होती. यात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. त्यामुळे या करिता सर्वांना विनंती आहे की नैसर्गिक आपत्तीमुळे आलेल्या चक्रीवादळात ही विठ्ठलाची मूर्ती खाली आली आहे. कुठल्याही अफवा पसरू नये, असे डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

“जो देश मुलींना वाचवू शकला नाही, आज त्या देशाला मुली वाचवताय”

मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाही; मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्यांना आदित्य ठाकरेंचे सणसणीत उत्तर, म्हणाले…

प्रेमविवाहाच्या १० महिन्यानंतर समोर आले बायकोचे खरे रुप; व्हिडिओ पाहून पायाखालची जमीनच सरकली


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: