बाळाचं बारसं झालं… नाव ठेवलं, धनश्री काडगावकरने शेअर केले मुलाच्या बारश्याचे फोटो

July 01, 2021 , 0 Comments

मु़ंबई। ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत वहिणीसाहेबांची दमदार खलनायिकी भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या आपल्या वैयक्तिक जीवनात व्यस्थ आहे.
काही दिवसांपूर्वी पुत्ररत्न प्राप्त झाल्याची माहिती धनश्रीनं सोशल मीडियावरुन चाहत्यांना दिली होती.

तेव्हापासूनच चाहते धनश्रीच्या बाळाची झलक पाहण्यासाठी आतूर झाले होते. काही महिन्यांपूर्वी धनश्रीच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं होतं. त्यानंतर तिनं तिच्या मुलाचा फोटो पहिल्यांदाच त्यांच्या बारश्या दिवशी चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

अखेर धनश्रीनं स्वतः बाळाचं बारसं झालं… नाव ठेवलं कबीर कुररररररररररररर…. , अशा कॅप्शनसह धनश्रीनं फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
मुलाला जन्म दिल्यानंतरही धनश्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.

त्यामुळे ती बाळाचा फोटो केव्हा शेअर करणार याबद्दल चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर बाळाच्या बारश्याचे सुंदर फोटो शेअर करत धनश्रीनं चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. तसंच तिनं बाळाचं नाव ‘कबीर’ असं ठेवलं आहे. गेल्या वर्षी एक खास व्हिडिओ शेअर करत गरोदर असल्याची बातमी धनश्रीनं चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

धनश्रीच्या कामगिरी बद्दल बोलायचं झालचं तर धनश्रीने यापूर्वी ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ , ‘गंध फुलांचा गेला सांगून’ ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांमध्येही काम केले आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: