अभिमानास्पद! कॅनडाच्या OIFFA अवॉर्डमध्ये सोलापूरचा अक्षय इंडीकर ठरला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

June 28, 2021 , 0 Comments

मुंबई । सोलापूरकरांसाठी एक अभिमानाची बातमी समोर आली आहे. गेल्या एक दशकापासून कॅनडामध्ये फिल्म फेस्टिव्हल होत असतो. याला ottawa indian film festival म्हणून ओळखले जाते. यावर्षी देखील या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले. यामध्ये यावर्षी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा अवॉर्ड सोलापूरच्या अक्षय इंडीकर यांना मिळाला आहे.

यामुळे सोलापूरसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्कारसोबतच स्थलपुराण या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार नील देशमुख या बालकलाकारास मिळाला आहे. यामुळे ही एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे.

अक्षयला मिळालेला हा बहुमान ही मराठी सिनेसृष्टीसाठी एक मोठी गोष्ट आहे. यामुळे मराठीचा डंका संपूर्ण देशात उमटला आहे. ही एक सर्व भारतीय सिनेजगतासाठी अभिमानाची बाब आहे. अक्षयच्या चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील अत्यंत नामांकित चित्रपट महोत्सवांमध्ये विविध पुरस्कारांवर नाव कोरले आहे.

यावेळी तो म्हणाला, चित्रपटाचे यश हे आमच्या संपूर्ण टीमचे यश आहे. निर्मात्यांपासून ते कॅमेरासमोर आणि पॅमेऱयामागे काम करणारे अशा सगळ्यांच्या मेहनतीने, प्रेमाने सिनेमा तयार झाला आहे. सध्या एक गोष्ट खूप मिस करतोय ती शूटिंग प्रोसेसला. कोरोनाचे संकट लवकर जाऊ दे आणि सारंकाही सुरळीत होऊ दे हीच प्रार्थना, असे त्यांने सांगितले.

भाषेची बंधने ओलांडून मराठी सिनेमा महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या बाहेर घेऊन जाता आला याचा आनंद आहे, सिनेमाला भाषा नसते तर सिनेमा हीच त्यांची भाषा असते, असेही त्याने सांगितले. यामुळे त्याचे सर्व स्थरातून कौतुक केले जात आहे.

‘त्रिज्या’ सिनेमाला नुकताच ‘बेस्ट साउंड डिजाईन’चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसेच केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अशियाई चित्रपट आणि बेस्ट भारतीय दिग्दर्शक असे दोन मोठे पुरस्कार देखील मिळाले आहेत. ‘यंग सिनेमा अवॉर्ड’ हा पुरस्कार देखील अक्षय इंडीकरला मिळालेला आहे.

ताज्या बातम्या

“आम्ही जगायचं कस बस्स झालं आता कोविड कोविड, अकाऊंटमध्ये फक्त ४०० रुपये आहेत…”

ओबीसी आरक्षणाचा वाद पेटला, आता वडेट्टीवारांचे धक्कादायक विधान, म्हणाले ओबीसी असल्याने..

..म्हणून श्रीदेवीने बोनी कपूरला त्यांची पहीली पत्नी आणि मुलांपासून केले होते दुर


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: