गोपीचंद पडळकर बांडगुळ, अशी बांडगुळं वाढत आहेत’, शिवसेनेचा पडळकरांवर घणाघात

June 28, 2021 , 0 Comments

मुंबई । भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे सतत चर्चेत असतात. ते कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करतात, तर कधी अजित पवारांवर. आता त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. संजय राऊत म्हणजे बिनबुडाचा लोटा आहे. असे त्यांनी म्हटले होते.

तसेच अशा भाटांची धनगर समाजाला आवश्यकता नाही. संजय राऊत खातात शिवसेनेचे पण जागतात पवारांच्या निष्ठेला, असा टोलाही पडळकरांनी लगावला होता. यामुळे आता शिवसेनेने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या टीकेला शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी जोरदार टीका केली आहे. गोपीचंद पडळकर हे बांडगुळ आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच जातीपातीवर मतं मागितली नाहीत. कधी जातीचे राजकारण केले नाही. असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

मोठ्या माणसांची नावे घेतली की आपले नाव मोठे होते असे पडळकरांना वाटते. गोपीचंद पडळकर हे बांडगुळ आहेत आणि अशी बांडगुळं वाढत आहेत, अशी घणाघाती टीका मनिषा कायंदे यांनी केली आहे. यामुळे आता वातावरण तापले आहे.

नुकतेच भाजपने राज्यात सगळीकडे ओबीसी आरक्षण परत मिळावे, यासाठी एल्गार केला. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातल्या विविध ठिकाणी हे आंदोलन पार पडले. ओबीसी आरक्षणाचा मारेकरी काँग्रेसच आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. यामुळे ठाकरे सरकारवर टीका करण्यात येत आहे.

सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेले आहे. पण माझ्या हातात पुन्हा सूत्र दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असेही फडणवीस म्हणाले होते. यामुळे हा वाद सुरू झाला आहे. यावर पडळकरांनी देखील आक्रमक भूमिका घेतली होती.

ताज्या बातम्या

अभिमानास्पद! कॅनडाच्या OIFFA अवॉर्डमध्ये सोलापूरचा अक्षय इंडीकर ठरला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

“आम्ही जगायचं कस बस्स झालं आता कोविड कोविड, अकाऊंटमध्ये फक्त ४०० रुपये आहेत…”

इंडिअन आयडल १२: गीतकार जावेद अख्तर घेणार अरुणीताची परीक्षा, अरुणीताच्या करियरवर होईल याचा परिणाम


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: