'त्या' दोन माओवाद्यांची ओळख पटली; दोघांवर होते १० लाखांचे बक्षीस

June 03, 2021 0 Comments

बस्तर: १ जून रोजी कोंडागाव जिल्ह्यात धनोरा क्षेत्रातील भंडारडीह डोंगरी भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाकडून दोन माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. या चकमकीनंतर शोधमोहीम राबविताना सुरक्षा दलाला एक महिला आणि एक पुरुष असे दोन माओवाद्यांचे मृतदेह मिळाले होते. त्यांची ओळख पटली असून पुरुष माओवाद्याचे नाव आसू कोरचा (२०) हा दक्षिण चा रहिवासी होता तर महिला रीना नरोटी (२७) तमोडा जिल्हा आमाबेडा असे असून त्यांच्यावर ५-५ लाख रुपयांचे बक्षीस आधीच जाहीर केले होते. (two maoists were identified both had a prize of rs 10 lakh) ही दोन्ही जहाल माओवाद्यावर विविध गुन्हे दाखल असून त्यांच्यावर शासनाने ५-५ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. उत्तर बस्तर भागात ३१ मे रोजी रमेश टेकाम यांच्यासह इतर १० ते १२ माओवादी उपस्थित असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. त्यानंतर कोंडागांव जिल्हा मुख्यालयातून एक टीम या माओवाद्यांचा शोध घेण्यासाठी रवाना झाली.त्यानंतर १ जून रोजी १२.३० वाजता पोलीस आणि माओवादयांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन माओवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आलं होतं. चकमकीनंतर घटनास्थळावरून १ एसएल आर, १ रायफल आणि ३ बंदुका जप्त करण्यात आले होते. क्लिक करा आणि वाचा- आज २ जून रोजी बस्तर रेंजचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी आणि कोंडगाव चे पोलीस अधीक्षक सिद्धार्थ तिवारी यांनी चकमकीत सामील झालेल्या कोंडागांव डीआरजी चे अधिकारी व जवानांची भेट घेतली आणि कारवाईची माहिती घेऊन सर्व सैनिकांना मिळालेल्या यशाबद्दल कौतुक करून प्रोत्साहन दिले. मृत माओवाद्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: