'माझ्यामुळे लोकांचा मूड ऑफ झाला, आता मीच ऑफ होतो' असे स्टेटस ठेवले आणि...

June 03, 2021 0 Comments

जळगाव: 'माझ्यामुळे लोकांचे मूड ऑफ झाले पण मी स्वत: दुनियेतून ऑफ होत आहे. तसेच कुणाला काही चुकीचे बोलले गेले असेल तर माफी मागतो', अशा आशयाचे दोन स्टेटस व्हाट्सअॅपवर ठेऊन एका नवविवाहित तरुणाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येथील अयोध्यानगरात आज पहाटे उघडकीस आली. (वय २९) असे मृत तरुणाचे नाव आहे. ( ) वाचा: हर्षल याचे चार महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. एका खासगी कंपनीत तो नोकरीस होता. काही दिवसांपूर्वीच हर्षल याची पत्नी गायत्री माहेरी गेली होती. तेव्हापासून हर्षल तणावात होता. मंगळवारी रात्री १० वाजता तो कुटुंबीयांसह जेवण करून झोपला. त्यानंतर मध्यरात्री २ वाजून २२ मिनिटांनी त्याने त्याच्या व्हाट्सअॅपवर दोन स्टेटस ठवेले. काय होते स्टेटस? 'माझ्यामुळे लोकांचे मूड ऑफ झाले पण मी स्वत: दुनियेतून ऑफ होत आहे. मी माझ्या छोट्याशा जीवनाचा प्रवास खूप छान केला. लोकांच्या मनावर अधिराज्य केले आणि काहींच्या डोक्यात आणि मित्र परिवार छान लाभले. माझे आई-वडील हे दुनियातील खूप छान देवमाणूस आहेत. पुढचा जन्म त्यांच्या पोटी येवो ही प्रार्थना देवाला करतो आणि मी कोणाला या गोष्टीचा जीम्मेदार नाही समजत’ तसेच ‘आणि कोणाला काही चुकीचे बोलले गेले असेल तर माफी मागतो. मला माफ करा’ असे दोन स्टेटस त्याने मध्यारात्री व्हॉट्सअॅपवर ठेवले होते. वाचा: पहाटे साडेतीन वाजता उघडकीस स्टेटस ठेवल्यानंतर हर्षलचा मोबाइल सुरूच होता. त्यानंतर त्याने साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटे ३.३० वाजता हर्षलचे वडील प्रेमनाथ एकनाथ महाजन यांच्या लक्षात हा प्रकार आला. मुलाने आत्महत्या केल्याचे दृष्य पाहून त्यांना जबर धक्का बसला. कुटुंबीय, शेजारच्यांनी हर्षलला खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. मृत हर्षल याच्या पश्चात पत्नी गायत्री, वडील प्रेमनाथ महाजन, आई छायाबाई, मोठे भाऊ राहुल व वहिनी सुरेखा असा परिवार आहे. या प्रकरणी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील तपास करीत आहेत. कुटुंबीयांचा आक्रोश हर्षलच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीय, नातेवाईक व मित्रांनी रुग्णालयात एकच गर्दी केली होती. हर्षलच्या अवेळी जाण्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकांना अश्रू अनावर झाले होते. कुटुंबीय, मित्रांनी रुग्णालयात आक्रोश केला. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: