नागपूरला आता ब्लॅक फंसगचा विळखा; आज ४३ नवे रुग्ण, ४ मृत्यू

June 03, 2021 0 Comments

नागपूर: विषाणू संक्रमणावर मात करून बाहेर पडलेल्या रुग्णांना रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्याने होणाऱ्या ब्लॅक फंसगचा विळखा करकचून आवळला जात आहे. यात बुधवारी विभागामधून आणखी नव्या ४३ रुग्णांना बुरशीने ग्रासल्याचे निदान करण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत विभागातील रुग्णसंख्या १३६८ पर्यंत पुढे सरकली आहे. चिंतेची बाब म्हणजे उपचार घेत असलेल्या आणखी ४ बाधितांचा मृत्यू नोंदविला गेल्याने बळी संख्या ११२ पर्यंत पोहचली आहे. ( ) वाचा: नागपूरच नाही तर संपूर्ण विभागात सध्या ब्लॅक फंगस ( ) या बुरशीच्या संक्रमणाचा वेग वाढत आहे. विभागातील नागपूर जिल्हा यात सर्वांत घातक ठरत आहे. विभागात बुधवारी नव्याने वाढलेल्या ४३ पैकी ३५ रुग्ण फक्त नागपूर जिल्ह्यातील आहेत. बुरशीची लागण होऊन गुंतागुंत निर्माण झाल्याने होत अससेल्या मृत्यूतही नागपूर जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत या आजाराच्या विळख्यात सापडून १०५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात आज दगावलेल्या ३ जणांचा समावेश आहे. वाचा: नागपूर पाठोपाठ विभागातील आणि चंद्रपूर जिल्ह्यातही ब्लॅक फंगसच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आज वर्धेत ५ तर चंद्रपुरात नव्याने ३ रुग्णांची वाढ झाली. या खेरीज पूर्व विदर्भात सध्या ब्लॅक फंगसचे ६५० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी ५०२ रुग्णांवर नागपूर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. त्या पाठोपाठ वर्धा जिल्ह्यात ८६ आणि चंद्रपूर जिल्ह्यात ५३ रुग्णांवर बुरशी नियंत्रणाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत विभागात ७४३ रुग्णांच्या शल्यक्रिया करण्यात आल्या आहेत. तर ५८८ रुग्ण उपचारातून सुधारत असल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: