मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १६,५८०; ही आहे करोनाची आजची स्थिती

June 03, 2021 0 Comments

मुंबई: मुंबईत बाधित रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. रुग्णसंख्येत गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत आज वाढ झाली असली तरी ही संख्या हजाराच्या आतच राहिली आहे. गेल्या २४ तासांत क्षेत्रात ९२५ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर त्याचवेळी १ हजार ६३२ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. मुंबईत आता १६ हजार ५८० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, आज ३१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत या संसर्गाने मुंबईत १४ हजार ९३८ रुग्णांचा बळी घेतला आहे. ( ) वाचा: करोना संसर्गाच्या विळख्यात सापडलेल्या शहराला गेल्या काही दिवसांपासून दिलासा मिळताना दिसत आहे. करोनाचा दैनंदिन ग्राफ वेगाने खाली येत आहे. मुख्य म्हणजे मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर गेले असून रुग्णदुपटीचा कालावधी ४७७ दिवसांवर जाऊन पोहचला आहे. २६ मे ते १ जून या दरम्यान मुंबईत वाढीचा दर ०.१४ टक्के इतका राहिला आहे. मुंबईत आज २४ हजार ७३२ चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण ६३ लाख १९ हजार ९७८ इतक्या चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. वाचा: मुंबईत आज दिवसभरात ९२५ नवीन रुग्णांची भर पडली असून १ हजार ६३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण ६ लाख ७४ हजार २९६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. मुंबईतील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आता १६ हजार ५८० इतकी खाली आली आहे. वाचा: - गेल्या २४ तासांत मुंबईत करोनाच्या विळख्यातील ३१ जणांचा मृत्यू झाला. त्यात २३ रुग्ण सहव्याधीग्रस्त होते. आतापर्यंत एकूण १४ हजार ९३८ रुग्णांना प्राण गमवावे लागले. - मुंबईत आतापर्यंत ७ लाख ८० हजार ७ जणांना करोना संसर्गाची लागण झाली आहे. त्यातील ६ लाख ७४ हजार २९६ रुग्ण बरे झाले. - मुंबईतील चाळी आणि झोपडपट्टी विभागात सध्या ३० सक्रिय आहेत तर एकूण १५१ इमारती सध्या सील करण्यात आलेल्या आहेत. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: