इंडिअन आयडल १२: अमित कुमार यांच्या गप्प बसण्याचा गैरफायदा घेऊ नका; सोनू निगम मेकर्सवर भडकले

June 03, 2021 , 0 Comments

‘इंडियन आयडल १२’ संदर्भात वादांचे उधान सुरूच आहे आणि जे वाढत चालले आहे. ‘इंडियन आयडल १२’  च्या एका भागात किशोर कुमारची खास थीम होती. या भागात किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांना बोलावण्यात आले होते.

मात्र एपिसोड दरम्यान किशोर कुमारच्या गाण्यावर स्पर्धक आणि परीक्षक गाण्यास अपयशी ठरल्याने चाहते संतप्त झाले आणि त्यांनी आपला संताप सोशल मीडियावर व्यक्त केला. त्याचबरोबर चाहत्यांच्या नाराजीला पाठिंबा दर्शवत अमित कुमार म्हणाले की, त्यांनाही तिथेही प्रत्येकाची कामगिरी आवडली नाही, परंतु मेकर्सने त्यांचे कौतुक करण्यास सांगितले होते आणि तेच मी केल. या गोष्टीवरून अमित कुमार यांना वाईट बोलले गेले.

इंडियन आयडॉलचे  माजी परीक्षक असलेले गायक सोनू निगम आता अमित कुमारच्या समर्थनार्थ आले आहेत. जे की इंडिअन आयडलच्या पहिल्या दोन सिजनमध्ये आणि सातव्या सिजनमध्ये परीक्षक म्हणून कार्यरत होते. सोनूने आपल्या व्हिडिओ संदेशाद्वारे शोच्या निर्मात्यांना हा वाद संपविण्याचे आवाहन केले आहे. हा वाद वाढल्याबद्दल सोनू निगम यांनी आदित्य नारायण आणि मनोज मुंतशिर यांना जबाबदार धरले आहे.

सोनूने निर्मात्यांना सांगितले की, अमित अगदी सरळ आणि खूप सभ्य माणूस आहे. ते कोणालाही काही बोलत नाहीत. तुम्ही लोक त्याचा गैरफायदा फायदा घेत आहात. आपण हा वाद संपवला पाहिजे. कारण इथं कोणाचीच चूक नाही तरीही अमित कुमार यांच्या विषयी सातत्याने बोलले जाते.

अमित कुमार यांनी स्पर्धकांविषयी काहीही वाईट बोललेले नाही. कारण त्यांना माहित आहे सगळेच कोणी किशोर कुमार बनू नाही शकत आणि तरीही स्पर्धकांनी त्यांच्या परीने पूर्ण प्रयत्न केले आहे.  मनोज मुंतशिर आणि आदित्य नारायण यांच्यासह जे लोक हा मुद्दा सातत्याने उपस्थित करीत आहेत त्यांचा दोष आहे. अमितजींविषयी कोणी काही बोलावे अशी माझी इच्छा नाही.

अखेर सोनू म्हणाला की, मी सर्वांना विनंती करतो की कृपया अमितजीला या वादातून सोडा. तसेच इंडियन आयडॉल हे एक मोठे व्यासपीठ आहे. मी कार्यक्रमात गाणारी मुले ऐकतो. ते खूप छान गात आहेत. आणि  मी सर्वांना कृपया विनंती करतो की शांत रहा. एक माणूस शांतपणे बसलेला आहे. जे की ते किशोर कुमारजी यांचे पुत्र आहेत, त्यांच्या गप्प बसण्याचा फायदा घेऊ नका.

हे ही वाचा-

मोदी सरकारची अदानीवर मेहेरबाणी! विमानतळ वापराचे दर १० पटींनी वाढवण्यास दिली परवानगी

मराठ मोळ्या साडीवरील पुण्याची मैना& घेऊन आली वेस्टर्न ड्रेसमधील डान्स; नुसता राडा

२२ वर्ष छोट्या सायरा बानूसोबत लग्न करण्यापूर्वी अनेक अभिनेत्रीसोबत जोडले गेले होते दिलीप कुमारचे नाव


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: