१५ तासांपूर्वी जन्मलेल्या बाळाला करोनाची लागण; आईची चाचणी निगेटिव्ह

June 01, 2021 0 Comments

पालघरः करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना पालघरमध्ये एका संसर्गाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका तरुणांना बसल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. तसंच, तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना बसण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्सही स्थापन करण्यात आला आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच पालघरमध्ये नवजात बाळाला करोनाची लागण झाल्यानं चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सफाळे येथील टेकरीचा पाडा येथील रहिवाशी असलेल्या एका नवजात बालकाला करोनाची बाधा झाली आहे. बाळाच्या जन्मानंतर १५ तासाने त्याची अँटिजन रॅपिट टेस्ट करण्यात आली होती. त्याचदरम्यान त्याच्या आईचीही चाचणी करण्यात आली होती. मात्र, यावेळी बाळाची अॅटीजन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तर, बाळाच्या आईची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. वाचाः खासगी रुग्णालयात उपचार या नवजात बालकाची प्रकृती स्थिर असून त्याला पुढील उपचारासाठी जव्हार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर बाळाच्या आईवर पालघर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बाळाची प्रकृती स्थिर असली तरी काही गुंतागुंत असल्याने त्यावर जव्हार रुग्णालयात उपचार देणे सोयीचे जाईल असे ग्रामीण रुग्णालयात असलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. बालकांसाठी टास्कफोर्स तिसऱ्या लाटेमध्ये बालकांना करोनाची लागण होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने त्यासाठीचे नियोजन शासनाने आधीच सुरु केल्याचे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. बालकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्कफोर्सची माहितीही त्यांनी दिली आहे. तसंच, उपचार पद्धतीत एकसूत्रता हवी, विषाणूच्या बदलत्या स्वरूपामुळे डॉक्टर्सना तज्ञांकडून योग्य ते मार्गदर्शन व्हावे व त्यांच्या शंकांचे समाधान व्हावे, यावरील नवनवीन माहिती त्यांना मिळावी व सर्व डॉक्टर्सचा सहभाग वाढवा म्हणून ऑनलाईन वैद्यकीय परिषदांचे आयोजन करण्याचे ठरविले, असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: