नेहा कक्करच्या पंजाबी गाण्यावरचा भांगडा घालतोय धुमाकूळ; पहा व्हिडिओ

June 01, 2021 , 0 Comments

सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर अनेक गोष्टींना घेऊन सतत चर्चेत असते. तसेच तिच्या आवाजाचे अनेक दिवाने आपल्याला पाहायला मिळतात. नेहा कक्कर आपले अनेक व्हिडिओ सोशल मिडीयावर चर्चेत आहेत. तिच्या गाण्यांबरोबरच तिच्या डान्सच्या व्हिडीओंनी देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

नेहाची पंजाबी गाणी इंटरनेटवर खूपच लोकप्रिय आहेत. तिच्या गाण्यांचे प्रचंड फॉलोअर्स पाहायला मिळतात. काहीच दिवसांपूर्वी नेहा कक्कर आपल्या चाहत्यांसाठी आणखी एक पंजाबी गाणे ‘खद तैनु में दसा’ घेऊन आली आहे. तिचे हे गाणे बरेच सुपरहिट ठरले आहे. या गाण्यावर नाचतानाचा तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काहीच दिवसांपूर्वी आलेल्या ‘खद तैनु में दसा’ या पंजाबी गाण्यावर नेहा कक्कर भांगडा करताना दिसली आहे. तिने हा भांगडा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. नेहाच्या गाण्यासोबत तिचा डान्सही प्रेक्षकांना आवडला आहे.

नेहाने कॅप्शनमध्ये ‘बोट रॉकर्सवर मी माझी आवडती गाणी ऐकत आहे’ असे लिहिले आहे. यावरून असे दिसून येते की नेहा या व्हिडीओमध्ये एका कंपनीची जाहिरात करत आहे.  तिच्या या व्हीडीओला लाखो लाईक मिळाले आहे. तसेच कमेंटचाही वर्षाव झालेला दिसतोय.

नेहाच्या या भांगडा व्हिडीओवर तिचा पती रोहनप्रीतने याने देखील कमेंट केली आहे. त्याने ‘हाहाहा.. आय लव्ह यू एंड यूर क्युटेस्ट भांगडा’ असे या कमेंटमध्ये लिहिले आहे. त्या दोखांची जोडी अनेकांना खूप पसंद आहे. त्या दोघांना अनेक रियालिटी शोमध्ये एकत्र पाहायला मिळाले.

नेहाचे आणि तिच्या पतीचे इतक्यातच ‘खद तैनु में दसा’ हे गाणे रिलीज झाले आहे. त्यांच्या या गाण्याचे अनेक दिवाने आहेत. सध्या नेहा कक्कर या दिवसांत उत्तराखंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. तिथून तिने आपले काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

हे ही वाचा-

अवघ्या ७ वर्षाच्या मुलीच्या धाडसाचे आयएएस अधिकाऱ्यानेही केले कौतूक; म्हणाला, ही मुलगी माझी गुरू..

नेहा कक्करचा पंजाबी गाण्यावर धमाल ‘भांगडा’, पती रोहनप्रीत कौतुक करत म्हणतोय…

IPL नंतर आता घरी पोहोचला हा खेळाडू, प्रेग्नंट गर्लफ्रेंडला मिठी मारत ढसाढसा रडला, आणि..


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: