राज्यात निर्बंध कायम; 'अनलॉक' विचाराधीन; मंत्री वडेट्टीवार बोलून फसले!

June 04, 2021 0 Comments

मुंबई: संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. करोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत, असे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री यांनी पाच टप्प्यात राज्यात केले जाणार असल्याचे जाहीर केल्यानंतर सरकारकडून त्याबाबत स्पष्टीकरण आल्याने अनलॉक नेमके कसे होणार हे शासन निर्णय जारी झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. ( ) वाचा: मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथील करायला सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथील करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे अधिसूचित करण्यात येतील, असेही पुढे नमूद करण्यात आले आहे. वाचा: निश्चित करण्यात येणाऱ्या निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथील करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन आहे. जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते शासन निर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. वडेट्टीवार बोलून फसले! मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यात पाच टप्प्यांत अनलॉक केले जाणार असल्याची घोषणा केली होती. पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजनची सुविधा असलेल्या बेड्सची उपलब्धता या आधारावर जिल्ह्यांची वर्गवारी करण्यात आली असून हे जिल्हे पाच टप्प्यांत लॉकडाऊनमुक्त होतील, असे त्यांनी नमूद केले होते. या जिल्ह्यांची टप्पेनिहाय यादी देताना वडेट्टीवार यांनी निर्बंध कसे शिथील होतील, हेसुद्धा सांगितले होते. पहिल्या टप्प्यात १८ जिल्हे अनलॉक होतील. दुसऱ्या टप्प्यात सहा, तिसऱ्या टप्प्यात १० आणि चौथ्या टप्प्यात दोन जिल्हे अनलॉक होतील, असे त्यांनी नमूद केले होते. पॉझिटिव्हिटी रेट ज्या जिल्ह्यांत पाच टक्क्यांच्या खाली आहे तिथे उद्यापासून (४ जून) पूर्णपणे उठवण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र, असा निर्णय झालेलाच नाही, प्रस्ताव विचाराधीन आहे, असे सरकारने स्पष्ट केल्याने वडेट्टीवार बोलून फसल्याचे दिसत आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: