१००९ धावा करून सगळे रेकॉर्ड मोडणारा प्रणव धनावडे अखेर समोर आला; सचिन, अर्जुनबाबत म्हणाला..

June 06, 2021 , 0 Comments

मुंबई । क्रिकेटविश्वात पाच वर्षांपूर्वी एक रेकॉर्ड नोंदवले गेले. यामुळे क्रिकेटमध्ये एकच खळबळ उडाली. प्रणव धनावडेने २०१६ साली १५ वर्षांच्या प्रणवने शालेय क्रिकेटच्या फक्त एकाच सामन्यात तब्बल १००९ रन केले होते. यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले होते.

३२३ बॉलमध्ये त्याने ५९ सिक्स आणि १२७ फोर लगावले. क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये हा सर्वाधिक वैयक्तिक स्कोअर आहे. यामुळे त्याने सर्वांचे रेकॉर्ड तोडले होते. या अफलातून खेळामुळे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही प्रणवचे कौतुक केले होते.

सचिनने त्याला घरीही बोलावले होते. मात्र यानंतर असे काय घडले की पुन्हा तो चर्चेत आला नाही. आता मात्र प्रणव समोर आला आहे. आणि त्याने नेमक्या काय चुका झाल्या याबाबत भाष्यं केले आहे.

तो म्हणाला, ‘रेकॉर्ड केल्यानंतर अपेक्षा फार वाढल्या. प्रत्येक वेळी मी बॅटिंगला जायचो, तेव्हा माझ्यावर दबाव यायचा. माझ्यासाठी हे खूप कठीण झाले, कारण अनेकवेळा माझे लक्ष भरकटले आणि मी खराब शॉट मारले, असे प्रणव म्हणाला. यामुळे त्याच्या कामगीरीवर परिणाम झाल्याचे त्याने सांगितले.

तो म्हणाला, सचिनने आपल्याला घरी बोलावले आणि त्याच्याकडे असलेली बॅट मला गिफ्ट म्हणून दिली. मी अर्जुन तेंडुलकरचा मित्र आहे. माझ्या खेळीनंतर सचिनने मला घरी बोलावले. माझ्यासाठी हे एखादं स्वप्न सत्यात उतरण्यासारखे होते.

मुंबईत रिक्षाचालकाचा मुलगा असणाऱ्या प्रणवने १००९ रन केले होते. त्याने एईजे कॉलिन्स यांचा ११७ वर्ष जुना विक्रमही मोडीत काढला. १८९९ साली इंग्लंडच्या शालेय क्रिकेटमध्ये कॉलिन्स यांनी ६२८ नाबाद रनची खेळी केली होती. त्याने मात्र सगळे रेकॉर्ड मोडले होते.

ताज्या बातम्या

…तर पोटाला बॉम्ब लावून बाकीच्यांना उडवून टाकू; मराठा आरक्षणप्रश्नी नरेंद्र पाटलांचा ठाकरे सरकारला इशारा

अजून धोका टळलेला नाही, निती आयोगाने सांगितले कोरोनाची तिसरी लाट कधी येणार….

घराच्या दारांना कड्या आणि कुलुप लावून बसणाऱ्या मराठ्यांनो तुमची लाज वाटते- विनायक मेटे


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: