मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, १२ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. यामुळे आता अनेकजण शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आता शिवसेनेने वर्ध्यात भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपच्या आजी-माजी १२ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेने मुक्ताईनगरमध्ये भाजपला धक्का दिल्यानंतर आता वर्ध्यातील नगरसेवकांना शिवसेनेत सामील केले आहे. हिंगनघाटमधील १० नगरसेवक आणि २ माजी नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्य उपस्थितीत वर्षा बंगल्यावर शिवसेनेत प्रवेश केला आहे. मोदी-ठाकरे यांच्या भेटीनंतर हा शिवसेनेचा पहिलाच धक्का आहे.
हिंगणघाटच्या नगरपरिषदेत सध्या भाजपची सत्ता आहे परंतु आगामी नगरपालिका निवडणुकींमध्या भाजपची सत्ता उलथवण्याच्या दिशेने शिवसेनेची वाटचाल सुरु आहे. वर्ध्यातील हिंगणघाटमधील १० नरसेवक आणि २ माजी नगरसेवकांनी भाजपवरील नाराजीमुळे शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
राज्यात शिवसेना भाजप पुन्हा एकदा एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना या घडामोडी घडल्या आहेत. शिवसेना आमदारांनी भाजपसोबत जुळवून घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. यामुळे एकच खळबळ उडाली होती.
आता मात्र असे असताना भाजप नेते शिवसेनेत दाखल झाले आहेत. हिंगणघाटमधील अनेक मंडळी ही शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहे. भविष्यात वर्धा जिल्ह्यात शिवसेना भक्कम आणि बळकट कशी करावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत. सर्व नगरसेवक त्यासाठी प्रयत्नशील राहतील आणि शिवसेना बळकट करतील.
या नगरपालिकेत लगेच बदल होणार नाही. आमची जी भूमिका आहे त्या भूमिकेनुसार निश्चितपणे बदल घडवून आणू तसेच ऑक्टोबरमध्ये निवडणूका होणार आहेत. त्या निवडणुकीत आता शिवसेनेची सत्ता आणण्याचा निश्चय केला आहे. यामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे.
ताज्या बातम्या
पतीने पत्नीचे अश्लिल विडिओ केले शूट, पोलिसांनी मोबाईल उघडताच धक्कादायक प्रकार आला समोर
काय सांगता! शेवग्यापासून चॉकलेट, चिक्कीची विक्री करून हा तरुण कमावतोय ३ लाख, वाचा..
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: