WHO चे खळबळजनक विधान! सरकारी आकड्यापेक्षा कोरोना रुग्णांच्या मृत्युंची खरी आकडेवारी फार मोठी

May 22, 2021 , 0 Comments

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरातच नाही, तर जगभरात थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून रोज हजारो रुग्णांचा मृत्यु झाला आहे. सध्या मृत्युंच्या आकड्याबाबत सरकार माहिती देत आहे.

अशात जागतिक आरोग्य संघटेनेने धक्कादायक विधान केले आहे. कोरोनामुळे मृत्यु होणाऱ्या मृत्युची आकडेवारी फार मोठी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

कोरोनाच्या काळात कोरोनामुळे होणाऱ्या सर्वच मृत्युंची नोंद झालेली नाही.सरकारी आकडे जे आपलेसमोर येत आहे. त्यापेक्षा कित्येक जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु होत आहे, असे जागतिक आरोग्य संघनेने म्हटले आहे.

आतापर्यंत ६० ते ८० लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. मात्र सरकारी आकडा बघितला तर तो आकडा फक्त ३४ लाख ४६ हजार रुग्णांच्या मृत्युंचा आहे, असेही जागतिक आरोग्य संघनेने म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघनेने वार्षिक ग्लोबल हेल्थ स्टॅटिस्टिक्स रिपोर्ट जाही केला आहे.त्यानुसार, कोरोनामुळे वर्ष २०२० मध्येच जवळपास ३० लाख लोकांचा मृत्यु झाला आहे. मात्र विविध देशातील नोंदवलेली आकडेवारी फक्त १२ लाख आहे.

तसेच मे २०२१ पर्यंत कोरोना रुग्णांच्या मृत्युची संख्या ३४ लाख नोंदवली गेलेली आहे. मात्र ही सरकारी आकडेवारी खरी नसून खरी आकडेवारी दोन ते तीन पट जास्त असल्याची दाट शक्यता आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे असिस्टंट डायरेक्टर-जनरल समीरा आसमा यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

VIDE0: कोरोना रुग्ण एका झटक्यात बरा होणार! औषधासाठी तोबा गर्दी, ICMR करणार चाचणी
सैराटमधील प्रदीप आठवतोय? सध्या काय करतोय बघून आश्चर्यचकीत व्हाल
पांरपारिक शेतीला फाटा देत केली श्रीलंकेच्या कोलंबस नारळाची शेती, कमावतोय १० लाख


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: