मुंबई: सोशल मीडियावर अश्लील व द्वेषपूर्ण पोस्ट टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणाऱ्या प्रदीप गावडेंनाच उलट अटक!
काही दिवसांपूर्वी ॲड.प्रदीप गावडे यांनी अत्यंत अश्लील, द्वेषपूर्ण पोस्ट टाकणाऱ्या 54 जणांवर कायदेशीर गुन्हे दाखल केले होते, त्या 54 जणांच्या पाठिंबा दर्शवणारे ट्विट राष्ट्रवादी चे मंत्री आव्हाड यांनी केले होते.... तेंव्हापासून गावडे यांना लक्ष करण्यात आले आणि त्यांचे पूर्वी कधीतरी केलेल्या ट्विट बद्दल आज मुंबई पोलिसांनी कोणतीही सूचना न देता अटक केली आहे.
हिंदू समाजावर व भारतीय संगराज्यावर टीका करणाऱ्या शर्जील उस्मानी ला आघाडी सरकार ने अजून हात लावला नाही पण उस्मानीवर गुन्हा दाखल करणारे ॲड.प्रदीप गावडे यांना मात्र सूचना न देता अटक करण्याची तत्परता दाखवली. आणि गुन्हा काय तर घटनात्मक अभिव्यक्ती स्वातंत्र्य चा आधारे ट्विट्स केले म्हणून.
हिंदू समजला सडके म्हणणाऱ्या, भारतीय संघराज्यावर विश्वास नाही म्हणत टीका करणाऱ्या शर्जील उस्मानी वर पुणे पोलिसांनी फक्त एक कलम दाखल केले, आणि प्रदीप गावडेंवर मात्र पाच-पाच कलमे दाखल केले. ॲड.प्रदीप गावडे कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर वकील म्हणून बाजूही मांडत आहेत, गेल्या वर्षी गावडे यांनी दिलेल्या अर्जावरून चौकशी आयोगाने थेट शरद पवार यांना समन्स बजावले होते व त्यांची साक्षही होणार होती. परंतू कोरोनामुळे ती पुढे होणार आहे.
ॲड.प्रदीप गावडेंचा नेमका गुन्हा काय ?
आघाडी सरकार वर टीका केली म्हणून ? राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले ? एल्गार परिषदेत गरळ ओकणार्या शर्जील उस्मानी वर गुन्हा दाखल केला म्हणून ? की पवार साहेबांच्या विरोधात अर्ज केला म्हणून ??
भारतीय जनता पार्टीने व्यक्त केला रोष
"सूडबुद्धीने ही कारवाई होत आहे हे स्पष्ट आहे. ॲड.प्रदीप गावडे अशा कारवाईला घाबरत नाही, सत्याचा विजय होईल. कोणतीही नोटीस न देता अशा प्रकारे झालेल्या अटकेचा जाहीर निषेध, मोगलाई आघाडी सरकार चा जाहीर निषेध."
अशा प्रकारे भारतीय जनता पार्टी ने आपला रोष व्यक्त केला आहे.
0 Comments: