ही तर पॅन्ट घालायची विसरली! कपड्यांमुळे ‘ही’ अभिनेत्री झाली ट्रोल, पाहा विडिओ

May 26, 2021 , 0 Comments

मुंबई । बॉलीवूड अभिनेत्री तसेच अभिनेते त्यांच्या वेगवेगळ्या फॅशनमुळे चर्चेत असतात. असे असताना कधी कधी त्यांच्या कपड्यांमुळे ते ट्रोल देखील होतात. आता देखील अशीच एक बॉलीवूड अभिनेत्री ट्रोल झाली आहे. अभिनेत्री जास्मिन भसीन ही आता ट्रोल झाली आहे. तिच्या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

बिग बॉस १४ फेम टीव्ही अभिनेत्री जास्मिन भसीन सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती चाहत्यांसाठी अनेक व्हिडीओ शेअर करण्याबरोबरच ती ग्लॅमरस फोटोही शेअर करत असते. आता मात्र तिला कपड्यांवरून ट्रोल करण्यात आले आहे.

ती तिच्या पाळीव कुत्र्यासोबत गेल्या आठवड्यात जुहू येथे आली होती. यावेळी तिने लाल रंगाच्या स्वेट शर्ट घातला होता. यासोबतच तिने काळ्या रंगाची छोटी शॉर्टस देखील घातली होती. मात्र तिची शॉर्ट्स इतकी छोटी होती की फोटोत ती दिसत देखील नव्हती.

यामुळे या विडिओमध्ये असे वाटत होते की जास्मिनने फक्त स्वेट शर्टच घातले होते. यामुळे तिच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले. या कपड्यामुळे ती आता चांगलीच ट्रोल झाली आहे. यावर अरे ही तर पॅन्ट घालायला विसरली. अशा अनेक कमेंट करत ट्रोल करायला सुरुवात केली.

तिचे हे फोटो आणि विडिओ सगळीकडे व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये जास्मिन गरीब मुलांशी अतिशय प्रेमाने बोलताना दिसत आहे. तिने त्यांच्याशी गप्पा मारत फोटो देखील काढले. यामुळे काही लोक जास्मिनचे कौतुक करत आहेत.

कपड्यांमुळे मात्र तिला काहींनी ट्रोल केले आहे. अभिनेता अली गोनी आणि अभिनेत्री जास्मिन भसीन हे लवकरच लग्न करणार आहेत. अशी चर्चा सध्या सुरू आहे. जास्मिन भसीन सध्या बॉलीवूडमध्ये आपले पाय रोवण्याच्या तयारी आहे. ‘बिग बॉस’मुळे ती सर्वांच्या चर्चेत आली आहे.

ताज्या बातम्या

‘अग्गबाई सुनबाई’ मालिका होणार बंद? ‘या’ प्रसंगामुळे प्रेक्षकांची मने दुखल्याने मोठा फटका

बोंबील खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा; होईल मोठा फायदा

मोठी बातमी! आता कोविड सेंटरमध्येच दाखल व्हावे लागणार, होम आयसोलेशन बंद, आरोग्यमंत्र्यांची माहिती


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: