सकाळी निर्णय, संध्याकाळी जीआर! कोरोना रोखण्यासाठी अजितदादा इन ॲक्शन मोड

May 26, 2021 , 0 Comments

मुंबई । राज्यावर आलेले कोरोनाने संकट अजूनही गेलेले नाही. अजूनही मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळत आहेत. यामुळे अजूनही मोठ्या प्रमाणावर काळजी घ्यावी लागणार आहे. सरकारकडून देखील अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र कोरोना अजून आटोक्यात आला नाही.

असे असताना निधीची कमतरता भासत आहे. मात्र उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे आपले झटपट काम करतच आहेत. आता त्यांनी ग्रामीण भागातील कोरोनाविरुद्धच्या लढण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातील निधी आरोग्य सुविधांवर खर्च करण्यास मंजूरी देण्याचा निर्णय अजित पवारांनी आज सकाळी घेतला.

असे असताना केवळ निर्णय घेऊन ते थांबले नाहीत, तर संध्याकाळी त्याचा जीआरही काढला. त्यामुळे निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे आता कोरोना लढाईत अनेक कामांना गती येणार आहे. ग्रामीण भागात निधी मिळताना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत होत्या. यामुळे कोरोना काळात अनेक अडचणी येत होत्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे झटपट कामांना गती देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. शक्यतो ते काम रखडून देत नाहीत. काम होत असेल तर त्याचा निर्णय ते लगेच घेतात. आणि सांगूनही काम झाले नाही तर ते अधिकाऱ्यांना चांगलेच झापतात.

पंधराव्या वित्त आयोगातील निधी खर्च करण्यास मंजूरी देण्यात आल्याने ग्रामीण भागात आरोग्य सुविधा उभारता येणार आहेत. ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सक्षम होणार आहे. कोरोना काळात हा मोठा दिलासा आहे. दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत.

तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. जिल्हा गौण खनिज विकासनिधीतून आरोग्यासाठी ३० टक्के निधी खर्च करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना आज देण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

ही तर पॅन्ट घालायची विसरली! कपड्यांमुळे ‘ही’ अभिनेत्री झाली ट्रोल, पाहा विडिओ

‘अग्गबाई सुनबाई’ मालिका होणार बंद? ‘या’ प्रसंगामुळे प्रेक्षकांची मने दुखल्याने मोठा फटका

या अभिनेत्रीवर होते करण जोहरचे प्रेम, नंतर तिनेच केले करणच्या खास मित्रासोबत लग्न


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: