'मुख्यमंत्र्यांनी कोकणचा दौरा केला नसता तरी चाललं असतं'

May 24, 2021 0 Comments

मुंबई: वादळानं कोकणच्या किनापरट्टीला जोरदार तडाखा दिला. शेती व घरांचं मोठं नुकसान झालं. या वादळानंतर विरोधी पक्षनेत्यांनी व मुख्यमंत्री यांनी कोकणचा दौरा केला. या दौऱ्यावरून आता सत्ताधारी व विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. (BJP Leader Criticises CM 's Konkan Tour) वाचा: दरेकर यांनी या संदर्भात एक व्हिडिओ ट्वीट केलं आहे. 'मुख्यमंत्र्यांनी कोकणचा दौरा केला नसता तरी चाललं असतं,' असं दरेकर यांनी म्हटलं आहे. 'मुख्यमंत्र्यांचा दौरा हा कोकणवासीयांच्या डोळ्यांत धूळफेक करणारा आणि दिखाऊपणाचा दौरा होता. विमानतळावर जाऊन बैठक घेणं आणि पुन्हा मुंबईत येणं एवढंच काम मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यापेक्षा मंत्रालयात बैठक घेऊन कोकणवासीयांना तात्काळ दिलासा दिला असता तरी चाललं असतं,' असं दरेकर म्हणाले. वाचा: 'महाविकास आघाडीचे मंत्री उदय सामंत, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार या सर्व मंत्र्यांनी पंचनाम्यांबद्दल वक्तव्य केलं होतं. दोन दिवसांत पंचनामे होतील, असं ते म्हणाले होते. मात्र, प्रत्यक्षात मुख्यमंत्री आठवडा उलटल्यानंतर कोकणात गेले. पंचनामे झाल्यानंतर मदत देऊ, असं त्यांनी तिथं सांगितलं. मुख्यमंत्री काहीतरी देऊन जातील, अशी आशा कोकणच्या जनतेला होती. मात्र, त्यांनी काहीही ठोस घोषणा केली नाही. आम्ही दौरा केला तेव्हा पंचनामे पूर्ण झाल्याचं जिल्हाधिकारी व तेथील अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं. खरंतर मदत ही पंचनाम्याच्या अंदाजानं करायची असते. पण ते झालेलं नाही. कोकणवासीयांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं,' अशी टीकाही दरेकर यांनी केली. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: