'लसीमुळं मृत्यू होतो...' म्हणत गावकऱ्यांचा लस घेण्यास नकार
चंद्रपूरः मुंबई, पुणे, नागपूर सारख्या मोठ्या शहरांत लसीकरणासाठी लांबच लांब रांगा लागल्या असताना चंद्रपूर जिल्ह्यातील काही गावांतील नागरिकांनी देत आहेत. या गावकऱ्यांना लस घेण्यास भीती वाटत असल्याचं म्हटलं जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील बामणी गावात ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण सुरु झालं आहे. मात्र, या गावातील नागरिकांनी लस घेण्यास साफ नकार दिला आहे. लस घेतल्यामुळं मृत्यू होतो, असा समज या गावकऱ्यांनी करुन घेतला आहे. गावकऱ्यांमध्ये लसीकरण मोहिमेबाबत जनजागृती व्हावी यासाठी स्थानिक प्रशासनाकडून विशेष अभियान राबण्यात येत आहे. मात्र, तरीही गावकऱ्यांनी लस घेण्यास नकार दिला आहे. तसंच, लस घेण्यासाठी आमच्यावर जबरदस्ती करु नका, आम्ही लस घेणार नाही, असंही म्हटलं आहे. वाचाः दरम्यान, बामणी गावात एप्रिल महिन्यात करोनाचा संसर्ग वाढला होता. करोना रुग्णांची संख्याही वाढली होती. त्यात अनेकांचा मृत्यू झाला होता. तरीही, बामणी ग्रामपंचायत हद्दीतील अमित नगर आणि केम आणि केम तुकूम या गावातील नागरिकांनी लस घेण्यास विरोध केला आहे. लस घेतला की मृत्यू होतो, असा त्यांचा समज झाला आहे. याबाबत सरपंचांनीही गावकऱ्यांना लस घेण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, तरीही गावकरी त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. वाचाः गावातील एका व्यक्तीनं करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता. मात्र, त्यानंतर त्या व्यक्तीला ताप आल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला. हीच भीती गावकऱ्यांच्या मनात बसली आहे. त्यामुळं गावकऱ्यांनी लस घेण्यास नकार दिला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: