'१० कोटी द्या अन्यथा शासकीय कार्यलयं बॉम्बने उडवून टाकू', धमकीच्या मेलमुळे खळबळ

May 24, 2021 0 Comments

नांदेड : दहा कोटी रुपये द्या, नाहीतर नांदेडचे जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय व अन्य शासकिय कार्यालय बॉम्बने उडवून टाकू, अशा धमकीचा मेल पाठवणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (ता.23) अटक केली. अधिक माहितीनुसार, आरोपी विरोधात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 125 जागी हॉटस्पॉट फुटायला तयार आहेत, अशी धमकी होती. सोबतच त्याने सर्व कार्यालयांची लिस्ट जोडली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ई-मेल आयडीवर 8 मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास एक मेल आला. यामध्ये 10 कोटी रुपये द्या अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालय, इतर महत्वाची कार्यालये आणि संपुर्ण नांदेड शहर बॉम्बने उडवून टाकेन असा संदेश सदर ई-मेलमध्ये लिहिलेला होता. या प्रकरणी विविध आंतरराष्ट्रीय कंपनीसोबत संपर्क साधून या मेल पाठविणाऱ्याची माहिती मिळवली. आरोपी शेख अब्दुल रफिक अब्दुल रऊफ (35, व्यवसाय व्यापारी, रा.आगापुरा अर्धापूर, जि.नांदेड यास रविवारी अटक केली. पोलीस उपनिरिक्षक आशिष बोराटे यांच्या तक्रारीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात धमकीचा मेल पाठविणाऱ्या शेख अब्दुल रफिक अब्दुल रऊफ याच्याविरूद्ध सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी धमकी देणाऱ्यास जेरबंद करणाऱ्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाचे अभिनंदन केले आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: