कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने घातला धुमाकूळ?; ‘या’ ठिकाणी तब्बल ३४१ मुलांना झाला कोरोना
देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. पण रुग्ण वाढीची संख्या आता कमी होत असताना दिसून येत आहे. त्यामुळे आता सर्व शांत होत असतानाच एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
राजस्थानमध्ये कोरोनाची तिसरी लाट आल्याची चिन्हे दिसत आहे. राजस्थानच्या दौसामध्ये तब्बल ३४१ मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे राजस्थानात एकच खळबळ उडाली असून जिल्हा. प्रशासन आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सतर्क झाले आहे.
राजस्थानच्या दौसामध्ये कोरोनाच्या तिसऱ्य लाटेला सुरुवात झाली असल्याचे म्हटले जात आहे. दौसामध्ये ३४१ मुलांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. ही सर्व मुले ० ते १८ वर्षे वयोगटातील आहे. १ मे ते २१ मे या काळात या मुलांना संसर्ग झाला आहे.
दौसामध्ये ३४१ मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला असला तरी कोणत्याही मुलाला कोरोना संसर्गाची गंभीर लक्षणे नाहीये. पण या घटनेनंतर दौसाचे जिल्हा प्रशासन सावध झाले असून त्यांनी तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेत, रुग्णालयात सर्व व्यवस्था केली केली आहे.
दरम्यान, राजस्थानमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राजस्थान सरकार दिवस रात्र प्रयत्न करताना दिसून येत आहे. तसेच त्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी नागरीकांवर काही निर्बंधही लावले आहे.
तसेच कोरोनावर नियंत्रण मिळवता यावे, यासाठी आरोग्य विभाग घरोघरी जाऊन नागरीकांची कोरोना टेस्ट करणार आहे. तसेच कोरोना रुग्णांसाठी गावातच कोविड सेंटर उभारण्यात येणार असून तिथेच रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
कोरोना काळात सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता कोण?; मोदींना मिळाली ९० टक्के मतं
कलेक्टरने भररस्त्यात युवकाचा फोन तोडून मारली त्याच्या थोबाडीत; व्हिडीओ व्हायरल होताच कलेक्टर झाला ट्रोल
लग्नाच्या वाढदिवसाला भेट दिलेला एक किलो सोन्याचा हार निघाला नकली; उडाली खळबळ
0 Comments: