कोरोना काळात सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता कोण?; मोदींना मिळाली ९० टक्के मतं
देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक राज्यात बेड्स, ऑक्सिजन, औषधांचा तुडवडा निर्माण झाला आहे. विरोधी पक्षाकडून सतत केंद्र सरकारवर टिका केली जात आहे.
देशातील विरोधी पक्षासह आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही पंचप्रधान नरेंद्र मोदींच्या कोरोना परिस्थिती हाताळण्याच्या पद्धतीवर टिका केली होती. त्याबाबत काही लेखही ग्लोबल मीडियाने प्रसारीत केले होते.
आता जगभरात कोरोनाचा फटका बसलेल्या देशातील नेत्यांसंदर्भात एक ऑनलाईन जनमत चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये कोरोना काळात सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता कोणता? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी पंतप्रधानांना ९० टक्के मतं मिळाली आहे.
अमेरिकेतील द कॉनव्हर्सेशन या वेबसाईटने ट्विटरवर एक जनमत जाणून घेतले आहे. त्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या देशांपैकी भारतीय नेतृत्व हे साथरोगाची परिस्थिती हाताळण्यात सर्वात सुमार कामगिरी करणारे ठरल्याचे दिसून आले आहे.
द कनव्हर्सेशन वेबसाईटने पाच देशांमधील तज्ज्ञांच्या मदतीने त्यांच्या देशातील नेतृत्वाने कशाप्रकारे ही साथ हाताळताना गोंधळ घातला आहे, यासंदर्भात त्यांनी ट्विटरवर जनमत जाणून घेण्यासाठी एक पोल तयार केला होता.
त्या पोलमध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता कोण? असे विचारत चार पर्याय दिले होते. त्यामध्ये ब्राझीलचे बोल्सोनारो, भारताचे नरेंद्र मोदी, मॅक्सिकोचे ऍमलो आणि अमेरिकेचे ट्रम्प असे चार पर्याय होते. तसेच दुसरे काही उत्तर असेल तर कमेंटमध्ये कळवा, असे सांगण्यात आले होते.
त्यामध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता म्हणून मोदींना सर्वात जास्त म्हणजे मोदींना ९० टक्के मत मिळाली आहे. या पोलमध्ये ७५ हजार ४५० लोकांनी मत नोंदवली आहे. त्यामध्ये ६७ हजार ९०५ मते मोदींना मिळाली आहे. त्यानंतर ५ टक्के मत डोनाल्ड ट्रम्प, बोल्सोनोरा यांना ३.७ टक्के मतं मिळाली आहे. तर ऍमलो यांना फक्त १.३ टक्के मत मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
कलेक्टरने भररस्त्यात युवकाचा फोन तोडून मारली त्याच्या थोबाडीत; व्हिडीओ व्हायरल होताच कलेक्टर झाला ट्रोल
मालिकेसोबत नायरा खऱ्या आयूष्यात देखील आहे करोडोंच्या संपत्तीची मालकिण
दिल्लीचे नाव जोपर्यंत इंद्रप्रस्थ ठेवले जात नाही तोपर्यंत देश संकटात असेल: सुब्रमण्यम स्वामी
0 Comments: