Parbhani: आमदार रत्नाकर गुट्टेसह २० जणांवर गुन्हा, कारण...

April 01, 2021 0 Comments

परभणी: रासपचे येथील आमदार आणि त्यांच्या वीस कार्यकर्त्यांविरोधात गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलन करून जमावबंदी आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता, जिल्हाधिकाऱ्यांनी रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. तसे आदेश काढण्यात आले आहेत. त्यात राज्य परिवहन विभागाची एसटी सेवाही बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, वाहक-चालकांना घरी बसून पगार देण्यास परिवहन विभाग तयार नाही. त्यामुळे वाहक-चालकांना मुंबई विभागात जाण्यासाठी सक्ती केली जात आहे. जिल्ह्यातील गंगाखेड एसटी आगारातील चालकांना मुंबई येथे ड्युटीवर न जाऊ देण्यासाठी रासपचे गंगाखेड येथील आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी काल आंदोलन केले. मात्र या आंदोलनामुळे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याचे सांगत गंगाखेड पोलीस ठाण्यात गुट्टे यांच्यासह त्यांच्यासोबत आंदोलन करणाऱ्या वीस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी करोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश दिले आहेत. मात्र आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्यासह नगरसेवक राधाकिसन शिंदे, नगरसेवक सत्यपाल साळवे, प्रताप मुंडे, सुरेश बंडगर व इतर पंधरा ते वीस कार्यकर्ते व दोन एसटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: