मोदी सरकारचं अभिनंदन करत सुप्रिया सुळेंनी केली 'ही' मागणी

April 01, 2021 0 Comments

मुंबईः भविष्य निर्वाह निधीसह अन्य अल्पबचत योजनांमधील गुंतवणुकीवरील व्याजाला कात्री लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतला आहे. केंद्र सरकारनं अवघ्या काही तासांतच निर्णय बदलल्याने मोदी सरकारला टीकेचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार यांनीही मोदी सरकारला खोचक टोला लगावत आणखी मागणी केली आहे. पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले आहे. त्याचबरोबर घरगुती गॅसच्या वाढलेल्या किंमतीनं सर्वसामान्यांचं अक्षरशः कंबरड मोडलं आहे. गेल्या दोन महिन्यांत पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत जवळपास आठ रुपयांनी वाढ झालीये. तर, एलपीजी गॅसमध्ये तब्बल १२५ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. यावर बोट ठेवत खासदार सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारकडे एक मागणी केली आहे. वाचाः 'अल्पबचतीवरील व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय सरकारनं तातडीने फिरवला. सरकारचं याबद्दल अभिनंदन. यामुळं सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला. आता केंद्र सरकारनं अशीच तत्परता पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅस यांवर लादलेली मोठी दरवाढ देखील तात्काळ मागे घ्यावी ही विनंती,' असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. वाचाः अल्पबचत योजनांवरील व्याजदर कपात मागे अल्प बचतीच्या योजनांवरील व्याजदरात मोठी कपात करण्यात आली होती. हे नवे दर आजपासून लागू होणार होते. मात्र, हा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. नजरचुकीने काढले गेलेले हे आदेश मागे घेण्यात येत आहेत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: