corona in kolhapur: बाहेरील जिल्ह्यातून कोल्हापुरात जाण्याबाबत प्रशासनाने घेतला मोठा निर्णय
कोल्हापूर: वाढत्या करोनाला () पायबंद घालण्यासाठी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेरून जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सक्तीने सात दिवस संस्थात्मक अलगीकरण केंद्रात रहावे लागेल, असे आदेश दिले होते. शिवाय गृह अलगीकरणाबाबत स्वतंत्र सोय असेल तर त्याची खात्री करून ठेवता येईल असा निर्णय देसाई यांनी घेतला होता. हा नियम पाळला न गेल्यास त्यांना दंड ठोठावण्याचे आदेशच देण्यात आले होते. मात्र जिल्हाधिकारी देसाई यांनी हा आदेश आता मागे घेतला आहे. या आदेशामुळे नागरिकांना त्रास होण्याची शक्यता असल्याने हा आदेश मागे घेण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (The to come to Kolhapur only after testing the corona) जिल्हाधिकारी दौलत देसाई आपल्या आदेशात म्हणतात, 'कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यांमधून येणाऱ्या किंवा जिल्ह्यांतर्गत एका गावातून दुसऱ्या गावामध्ये वास्तव्यास जाणाऱ्या व्यक्तीची कोविड-१९ तपासणी आणि अलगीकरण करण्याता आदेश ६ एप्रिल रोजी देण्यात आला होता. मात्र या आदेशामुळे नागरिकांना त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने हा आदेश मागे घेण्यात येत आहे.' क्लिक करा आणि वाचा- परंतु, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोविड-१९च्या संसर्गाबाबत शासनाच्या सध्याच्या निर्देशानुसार स्वॅब तपासणी, त्याच प्रमाणे अलगीकरण आणि विलगीकरण कार्यवाही मात्र करण्यात येईल असे जिल्हाधिकारी देसाई यांनी आपल्या सुधारित आदेशात म्हटले आहे. कोल्हापुरात अत्यंत कमी असलेला करोनाचा संसर्ग वाढू लागला होता. यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या होत्या. मात्र कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या व्यक्तींमुळे हा संसर्ग वाढण्याचा मोठा धोका प्रशासनाला वाटत होता. म्हणूनच बाहेरून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला अलगीकरण केंद्रात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे चार लाख लोक जिल्ह्याबाहेर आहेत. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर ते कोल्हापुरात परतले होते. क्लिक करा आणि वाचा- राज्यात विकेंड लॉकडाउन आणि कडक निर्बंध लागू झाल्यानंतर सर्वाधिक मूळ कोल्हापूरकर मुंबई आणि पुण्याहून परतू लागले होते. या कारणामुळे करोनाला रोखता यावे म्हणून जिल्हा प्रशासनाने चाचणीचा निर्णय घेतला होता. मात्र, यामुळे लोकांची मोठी गैरसोय होऊ शकते हे लक्षात आल्यानंतर प्रशासनाने अखेर आपला निर्णय मागे घेतला. क्लिक करा आणि वाचा-
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: