नागपुरात करोनाचा उद्रेक; 'हे' आकडे भीतीदायक

April 07, 2021 0 Comments

नागपुरः जिल्ह्यात करोना रुग्णांची आकडेवारी दररोज साडेतीन हजारांहून अधिकच नोंदवण्यात येत असल्याने अजूनही परिस्थिती चिंताजनकच आहे. आज नागपुरात तब्बल ५ हजार ३३८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात करोनाचा संसर्ग वेगानं फैलावत आहे. त्यामुळं ही दुसरी लाट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागपुर हा करोनाचा हॉटस्पॉट ठरतोय का, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. काल नागपुरात मृत्यूसंख्येत किंचित घट झाली होती. मात्र, आज पुन्हा करोनामृतांचा आकडा वाढला आहे. नागपूर जिल्ह्यात दिवसभरात १९ हजार १९१ चाचण्या करण्यात आल्या. यात आज५ हजार ३३८ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळं एकूण करोनाबाधितांची संख्या अडीच लाखांच्यावर पोहोचली आहे. गेल्या दोन दिवसात करोनाच्या मृत्यूमध्ये किंचित घट झाली आहे. मात्र, आज पुन्हा हा आकडा वाढताना दिसत आहे. आज दिवसभरात ५५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील ३४ तर ग्रामीण भागातील २५ जणांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात वाढलेले मृत्यूचे प्रमाण बघता मृ्त्यूचा आकडा साडेपाच हजारांच्या वर गेला आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही घटले आहे.. आज ३ हजार ८६८ बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळं रुग्ण बरे दर घसरला आहे. आज रुग्ण बरे होण्याचा दर ८०. ९५ इतका झाला आहे. तर, शहरात ४२ हजार ९३३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: