राज्यात कोरोनाचा हाहाकार, रविवारी राज्यात ६३ हजार २९४ रूग्णांची विक्रमी नोंद
कोरोनाने राज्यात थैमान घातले आहे. रोज कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रविवारीही राज्यात कोरोना रूग्णांची विक्रमी नोंद झाली आहे. राज्यातील परिस्थिती हाताच्या बाहेर जाताना दिसत आहे. रविवारी राज्यात ६३ हजार २९४ रूग्णांना कोरोनाचे निदान झाल्याचे आढळले आहे.
राज्यात शनिवारी ५५ हजार ४११ कोरोना रूग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे हा आकडा किती मोठ्या संख्येने वाढला आहे हा चिंतेचा विषय आहे. रविवारी राज्यात ३४ हजार ००८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर ३४९ रूग्णांनी कोरोनाने आपला जीव गमावला आहे.
सध्या राज्यातील मृत्युदर १.७ टक्के एवढा आहे व तो वाढत चालला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण २७ लाख ८२ हजार १६१ लोकांनी कोरोनावर मात केलेली आहे. राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.६५ टक्के एवढे झाले आहे.
आजपर्यंत प्रयोगशाळेत तपासले गेलेले २ कोटी २१ लाख १४ हजार ३७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३४ लाख ७ हजार २४५ नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३१ लाख ७५ हजार ५८५ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर २ लाख ५२ हजार ६९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
पुणे जिल्हा कोरोना रूग्णसंख्येच्या बाबतीत आघाडीवर आहे. रविवारी दिवसभरात पुण्यात १२ हजार ३७७ नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. तर ८७ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यु झाला आहे. यामध्ये महापालिका परिसरात ६ हजार ६७९ नवीन रुग्णांची तर पिंपरी चिंचवड क्षेत्रात २ हजार ४०९ रूग्णांची आणि ग्रामीण भागात २ हजार ४६५ नव्या कोरोनाबाधित लोकांची नोंद झाली आहे.
मुंबईतही रविवारी ९ हजार ९८९ रूग्णांची नोंद झाली आहे. तर ८ हजार ५५४ लोकांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईत सक्रिय असलेल्या रूग्णांची संख्या ९२ हजार ४६४ इतकी आहे. रूग्ण दुपटीचा दर ३५ वर आला आहे. आतापर्यंत मुंबईतील ४ लाख १४ हजार ६४१ लोकांनी कोरोनावर मात केली आहे.
महत्वाच्या बातम्या
भर पावसात सभा घेतली पाटलांनी पण लोकांना आठवण झाली शरद पवारांची, वाचा नेमकं काय घडलं?
जमावाचा हल्ला, शस्त्रे हिसकावण्याचा प्रयत्न; बंगालमध्ये सुरक्षा दलांनी लोकांना कसे मारले? वाचा..
“सरकारने व्यापाऱ्यांना आर्थिक मदत करावी अन्यथा आम्ही लाॅकडाऊन जुमानणार नाही”
“सरकारने व्यापाऱ्यांना आर्थिक मदत करावी अन्यथा आम्ही लाॅकडाऊन जुमानणार नाही”
0 Comments: