राज्यात १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन होणार, टास्कफोर्सच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांची माहिती
राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एक सर्वपक्षीय बैठक घेतली होती आणि लॉकडाऊन हा एकच पर्याय असल्याचे सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सची बैठक रविवारी पार पडली. १४ एप्रिलनंतर कॅबिनेटमध्ये लॉकडाऊन करायचा की नाही याचा निर्णय होणार आहे.
ही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या बैठकीनंतर राज्यातल्या सर्व आयएएस अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये आज महत्वाची बैठक होणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनला सामोरे कसे जायचे, राज्यात लॉकडाऊन लावायचा झाला तर विभागाची तयारी, पुढील गणितं तसेच आर्थिक बाजूंची माहिती घेणार आहे. टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनची दाहकता किती ठेवायची? यावर चर्चा झाली.
जिकडे रूग्णसंख्या जास्त असेल तिथे लॉकडाऊन महत्वाचे आहे पण तेथील लोकांचे हालही झाले नाही पाहिजेत. लॉकडाऊन करायचे तर किती दिवस करायचे? राज्यातील आरोग्य यंत्रणा आणि कर्मचारी याचं नियोजन किती पटीने आणि कसे वाढवले पाहिजे? यावरही बैठकीत चर्चा झाली आहे.
लॉकडाऊन करायच्या आधी दोन दिवस अर्थ आणि अन्य विभागाच्या चर्चा होण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात महत्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनसाठी रोज बैठकी होत आहेत. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर पुन्हा एकदा बैठक होण्याची शक्यता आहे.
सर्व नियोजन आखण्यात आले आहे. मुख्य सचिन सिताराम कुंटे, आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांच्या अन्य अधिकारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये आज बैठक होणार आहे. टास्क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात कडक निर्बंध लादल्यानंतर ऑक्सीजन प्लॅन्टची उभारणी गरजेची आहे. बेड्स व इतर वैद्यकीय सुविधा वाढवणे गरजेचे आहे.
रेमडेसवीर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. लसीकरण वाढवणे विशेषत: सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे. यावर तात्काळ कारवाई व्हावी त्यासाठी राज्याला अधिक लसींचा पुरवठा व्हावा अशी विनंती परत एकदा पंतप्रधान मोदींना करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
राज्यात कोरोनाचा हाहाकार, रविवारी राज्यात ६३ हजार २९४ रूग्णांची विक्रमी नोंद
भर पावसात सभा घेतली पाटलांनी पण लोकांना आठवण झाली शरद पवारांची, वाचा नेमकं काय घडलं?
जयंत पाटलांच्या भाच्यावर पत्रकाराच्या खूनाचा गंभीर आरोप, महाविकास आघाडी पुन्हा अडचणीत
प्रदीप शर्मा होते सचिन वाझेचे गुरू, त्याला परत सेवेत घेण्यासाठी घेतली होती भाजपच्या मंत्र्याची भेट
0 Comments: