विरारमध्ये कोविड हॉस्पिटलला आग; अजित पवार म्हणाले...

April 23, 2021 0 Comments

मुंबई: विरारमधील विजय वल्लभ या रुग्णालयाला लागलेल्या आगीत आज १३ करोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. नाशिकमधील ऑक्सिजन गळतीनंतर घडलेल्या या दुर्घटनेमुळं संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री यांनी या दुर्घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. मृत रुग्णांच्या नातेवाईकांच्या प्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत. ( on ) वाचा: 'राज्यातील डॉक्टर, नर्सेस, शासकीय व खासगी आरोग्य यंत्रणा करोना संकटाशी युद्धपातळीवर लढत असताना नाशिक किंवा विरारसारख्या दुर्घटना घडून रुग्णांना प्राण गमवावे लागणे दुर्दैवी, क्लेशदायक आहे, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. 'पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून दुर्घटनेची माहिती घेतली असून अन्य रुग्णांची सुरक्षितता व त्यांच्यावरील उपचार सुरळीत सुरू राहतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत,' असं अजितदादांनी म्हटलं आहे. 'रुग्णालयांची सुरक्षितता, फायर ऑडिट करण्याचे निर्देश देऊनही अशा घटना वारंवार घडत आहेत. राज्यात आणि देशातही अशा घटना वाढल्या आहेत. यामागची कारणे उच्चस्तरीय समितीकडून शोधून त्रुटी कायमस्वरूपी दूर करण्याची बाब गांभीर्याने घेतली जाईल. मुख्यमंत्री महोदयांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून त्यातून तथ्य बाहेर येईल, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: