बॉलीवूडमधील लोकप्रिय नदीम-श्रवण जोडीतील संगीतकार श्रवण राठोड यांचे कोरोनामुळे निधन
मुंबई । बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध संगीतकार श्रवण कुमार राठोड यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. राठोड यांना काही दिवसांपूर्वीच कोरोना झाला हाेता. माहीम येथील रहेजा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते.
त्यांना कोरोना झाला होता, त्यांना हृदयविकार तसेच फुप्फुसाचाही त्रास होता. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र त्यांचे निधन झाले. ९०च्या दशकात नदीम-श्रवण या जोडीने सुपरहिट गाणी दिली होती. चित्रपट आशिकीमधील त्यांच्या संगीताने सगळ्यांना भुरळ घातली होती.
गेल्या तीन दिवसांपासून श्रवण राठोड यांची तब्येत बिघडल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. तसेच त्यांच्या दोन किडनी देखील व्यवस्थित काम करत नव्हत्या. त्यामुळे डॉक्टरांनी डायलिसिस सुरू केले होते.
संगीतकार नदीम श्रवण यांनी एकाहून एक हिट गाणी बॉलिवूडला दिली आहेत. या जोडीने नव्वदीचा काळ गाजवला होता. नदीम सैफी आणि श्रवण राठोड यांनी मिळून अनेक गाजलेली गीते चित्रपट रसिकांना दिली. त्यांची जोडी त्यांच्या आशिकी या चित्रपटातील गीतांमुळे विशेष लोकप्रिय झाली.
त्यांनी दिल है के मानता नही, साजन, सडक, साथी, दिवाना, फुल और काटे, राजा हिंदुस्तानी यांसारख्या चित्रपटांनाही संगीत दिले. ‘श्रवणच्या निधनामुळे मला खूप दुःख झाले आहे. माझ्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे,’ अशी प्रतिक्रिया नदीम यांनी आज दिली.
ताज्या बातम्या
सोनाली बेंद्रे आहे करोडोंच्या संपत्तीची मालकीण; पहा तिच्या घराचे फोटो
मानलं भावा! रेल्वेकडून मिळालेल्या ५० हजारांमधील अर्धी रक्कम मयुर देणार त्या अंध मातेला
सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या कॉमेडियन सुनील ग्रोवरच्या पत्नीच्या फोटो; दिसते खुपच सुंदर
0 Comments: