परमबीर सिंह यांची चार तास चौकशी; प्रदीप शर्मांना पण समन्स

April 08, 2021 0 Comments

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई अँटिलिया स्फोटके प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबईचे माजी पोलिस आयुक्त यांची बुधवारी तब्बल चार तास कसून चौकशी केली. माजी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा हेदेखील या चौकशीच्या फेऱ्यात अडकले असून एनआयए कार्यालयात रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. शर्मा आणि हे एकमेकांच्या संपर्कात असून या कटाविषयी शर्मा यांना माहिती असावी असा तपास यंत्रणेला संशय आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवास्थानाजवळ सुमारे अडीच किलो जिलेटीन ठेवलेली स्कॉर्पिओ कार सापडली होती. या प्रकरणात एनआयएने सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली. स्कॉर्पिओचे मालक असलेल्या मनसुख हिरन यांच्या मृत्यूप्रकरणाचा तपासही एनआयएकडे असून या दोन्ही प्रकरणात वाझे, विनायक शिंदे आणि नरेश गोर याच्यासह आणखी काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता तपास यंत्रणांना आहे. वाझे यांच्या चौकशीदरम्यान अनेक ठिकाणी परमबीर सिंह यांचे संदर्भ येत असल्याने एनआयएने जबाब नोंदविण्यासाठी त्यांना समन्स बजावले होते. जवळपास चार तासांच्या चौकशीनंतर दुपारी दीडच्या सुमारास ते एनआयए कार्यालयातून बाहेर पडले. माजी पोलिस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांचेही नाव वाझे यांच्या चौकशीतून पुढे येत असल्याने त्यांनाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास एनआयए कार्यालयात पोहोचलेल्या शर्मा यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: