'ही मंडळी भ्याडच म्हणावी लागतील'; चित्रा वाघ यांचा रोख कोणाकडे?
मुंबईः'अन्यायाविरोधात आवाज उठवल्यानंतर व त्यातही आवाज उठवणारी स्त्री असेल तर व्यक्तिगत आयुष्याचा मुद्दा बनवणारी ही मंडळी भ्याडच म्हणावी लागतील,' अशा शब्दात भाजप नेत्या यांनी एक ट्वीट केलं आहे. चित्रा वाघ यांच्या या ट्वीटचा रोख नेमका कोणाकडे आहे. याविषयी चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर टिकास्त्र सोडलं होतं. तर, राष्ट्रवादीच्या नेत्या यांनी त्यांच्यावर पलटवार केला होता. त्यामुळं चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला असल्याचं बोललं जात आहे. 'अन्यायाविरोधात आवाज उठवल्यानंतर व त्यातही आवाज उठवणारी जर स्त्री असेल तर व्यक्तिगत आयुष्याचा मुद्दा बनवणारी ही मंडळी भ्याडच म्हणावी लागतील. सुडाच्या भावनेतून होणारं राजकारण फार काळ टिकणार नाही हे लक्षात ठेवा,' असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. रुपाली चाकणकर काय म्हणाल्या होत्या? 'आता नवीन वसुली मंत्री कोण होणार?'' असा प्रश्न अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ यांनी टीका केली होती. चित्रा वाघ यांच्या टीकेला रुपाली चाकणकर यांनी उत्तर देताना 'चित्राताईंचा स्वत:चा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आहे आणि त्या नवीन वसुली मंत्री कोण हे विचारत आहेत,' असा टोला हाणला होता.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: