बेड न मिळाल्यामुळे उपचाराअभावी प्रसिद्ध डॉक्टरच्या वडीलांचाच कोरोनाने मृत्यू; दुर्दैवी घटनेने हळहळ

April 11, 2021 , 0 Comments

लखनऊ | राज्यासह संपुर्ण देशात कोरोनाची भयाण परिस्थिती पाहायला मिळत आहे. कोरोनावरील लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे. वेळेवर उपचार मिळत नसल्याने अनेक रूग्णांना प्राण गमवावे लागत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ मध्ये घडली आहे.

लखनऊ शहरातील डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी सरकारी रूग्णालयातील प्रसिध्द हृदयरोग तज्ञ डॉ.दिपक यांच्या वडिलांना उपचाराअभावी आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेक वर्ष प्रामाणिकपणे रुग्णांची सेवा करून त्यांचा जीव वाचवणाऱ्या डॉ. दिपक यांना त्यांच्या वडिलांना वाचवता आले नसल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.

डॉ. दिपक यांचे वडिल अर्जून चौधरी हे रेल्वे मध्ये नोकरीला होते. काही दिवसांपुर्वी ते निवृत्त झाले होते. डॉ दिपक यांनी गेल्या वर्षभरामध्ये अनेक कोरोना रूग्णांवर उपचार करून त्यांना बरे केले होते. रुग्णांची सेवा करत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

दिपक यांच्यासह त्यांच्या कुटूंबातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली. वडिल वयस्कर असल्याने त्यांना जास्त त्रास होऊ लागला. कोविड सेंटरमध्ये वडिलांना भरती करण्यासाठी त्यांनी खुप प्रयत्न केले पण कोरोना रिपोर्ट नसल्याने त्यांना दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला.

अखेर ६ एप्रिल रोजी रिपोर्ट आला. त्यानंतर आपल्या वडिलांना कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करून घ्या. अशी विनंती करूनही त्यांना समोरून प्रतिसाद मिळाला नाही. वेळेवर उपचार मिळत नसल्याने वडिलांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती.

वडिलांची प्रकृती पाहून दिपक यांनी स्वत: ऑक्सिजन सिलेंडर खरेदी केला. त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका सुध्दा उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यानंतर डॉ. दिपक यांनी स्वत:च्या कारमधून वडिलांना शहरातील लोकबंधू रूग्णालयात घेऊन गेले.

लोकबंधू रूग्णालयात उपचार होतील या आशेने गेलेल्या दिपक यांच्या वडिलांना तिथेही आयसीयुमध्ये बेड मिळाला नाही. त्यानंतर एका खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आले. मात्र तिथे योग्य व्यवस्था नसल्याने, उपचार वेळेवर न मिळाल्याने त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला.

वडिलांच्या मृत्यूनंतर दिपक यांच्या कुटूंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी वडिलांचा मृतदेह दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मिळाला. त्यांनतर त्यांनी वडिलांवर अंत्यसंस्कार केले.

महत्वाच्या बातम्या-

लाॅकडाऊन केला तर लोकांना आर्थिक मदत करा, अन्यथा उद्रेक होईल; फडणवीसांचा इशारा
महाराष्ट्रात १५ दिवसांचा लॉकडाऊन?आज टास्क फोर्सच्या महत्वाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार
…म्हणून लस घेतल्यानंतरही लोकांना होतेय कोरोनाची लागण, पुनावाला यांनी सांगितले कारण
..तर महिन्याभरात आपण कोरोनावर नियंत्रण मिळवू शकतो- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: