दिलीप वळसे पाटील यांनी घेतली पवारांची भेट; म्हणाले...
मुंबईः अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवार यांचे विश्वासू व निष्ठावंत नेते यांना गृहमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गृहमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बने अखेर अनिल देशमुख यांना हादरा दिला असून मुंबई होयकोर्टाच्या एका आदेशानंतर देशमुख यांनी स्वत:हून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अनिल देशमुख यांच्या राजीनामा स्वीकृत करावा, असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले होते. तसंच, गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा, असेही या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, गृहखात्याची जबाबदारी मिळाल्यानंतर दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर पोहोचले होते. आज सकाळी सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला गृहमंत्रीपदाची जबाबदारी मोठी आहे आणि ती पार पाडण्यास मला निश्चित आवडेल. आज दुपारी मी १. ३० वाजता मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारणार, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. वाचाः अनिल देशमुखांचा राजीनामा अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिना १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा दावा परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात केला होता. याप्रकरणी अॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना गृहमंत्री देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआयने १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करावी, असे आदेश आज मुंबई हायकोर्टाने दिले. त्यानंतर काही वेळातच अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: