'चंद्रकांतदादा पुण्याला पळून गेले असं म्हणणं कितपत योग्य आहे?'

April 05, 2021 0 Comments

कोल्हापूर: ' यांचा प्रवास साऱ्या महाराष्ट्रभर होत असतो. महाराष्ट्रातल्या कोणत्याही मतदारसंघात ते उमेदवारी करू शकतात. त्यामुळं निवडून येण्यासाठी ते पुण्याला पळून गेले असं म्हणणं कितपत योग्य आहे हे यांनीच तपासावं, असं सांगतानाच, 'मुश्रीफ यांनी महाराष्ट्रातील इतर कोणत्याही जिल्ह्यात निवडणूक लढवून विजयी होऊन दाखवावं,' असं आव्हान भाजपनं दिलं आहे. वाचा: 'चंद्रकांत पाटील हे अतिशय भित्रे आहेत. ते अपघातानं मंत्री झाले होते. कोल्हापुरातून पळून जावं लागलेल्या माणसानं उद्धव ठाकरे यांच्यासारख्या सोज्वळ व्यक्तीबद्दल बोलणं चांगलं नाही,' अशी टीका मुश्रीफ यांनी केली होती. मुश्रीफ यांच्या या टीकेला भाजपनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे उत्तर दिलं आहे. 'करोना महामारीत महाराष्ट्राला सावरण्यात आलेलं अपयश, सरकारमधील अनेक मंत्र्यांचे भ्रष्टाचार, गृहमंत्र्यांची पोलिसांकडे महिन्याला १०० कोटी खंडणीची मागणी अशा अनेक प्रकरणांवरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी मुश्रीफ हे चंद्रकांत पाटील यांच्यावर बेछूट आरोप करत आहेत, असा आरोप भाजपनं केला आहे. वाचा: भाजपचे संघटनमंत्री नाथाजी पाटील यांनी हे पत्रक काढलं आहे. 'मुश्रीफ यांनी चंद्रकांतदादांचा पक्षावरील निष्ठेचा इतिहास तपासावा. करोना काळात दादा महाराष्ट्रभर सेवाकार्यासाठी फिरत असताना मुश्रीफ हे फक्त कोल्हापुरातच दिसत होते. करोना काळात चंद्रकांतदादांनी केलेलं महाराष्ट्रातील काम पाहून मग मुश्रीफ यांनी बोलावं,' असंही भाजपनं सुनावलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या अर्वाच्च्य भाषेचा भाजपनं निषेध केला आहे. वाचा: 'शरद पवार हे लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना चंद्रकांतदादांनी केली होती. मुश्रीफ यांनी ते ऐकल्याचं दिसत नाही. तेच पवार यांच्या आजारपणाचं राजकारण करत आहेत, असा आरोप भाजपनं केला आहे. राज्यात आलेली करोनाची दुसरी लाट थोपवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश येत आहे. जिल्हा परिषदेत करोना साहित्य खरेदीत झालेला भ्रष्टाचार झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न मुश्रीफ यांच्याकडून होत आहे. त्यांनी राजकारण थांबवून करोनाची दुसरी लाट थोपवावी व महाराष्ट्रातील जनतेला वाचवण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहन भाजपनं केलं आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: