धक्कादायक! बॉलीवूड दिग्दर्शकाच्या पत्नी आणि मुलीची आत्महत्या; घरात घेतले जाळून

April 10, 2021 , 0 Comments

बॉलिवूडमधील दिग्दर्शक संतोष गुप्ता यांची मुलगी आणि पत्नीने मुंबईच्या अंधेरी परिसरामध्ये राहत्या घरात स्वतःला जाळून आत्महत्या केली आहे.हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच संतोष यांच्या पत्नीचा मृत्यू झाला तर घटनेच्या दुसऱ्या दिवशी मुलीचाही मृत्यू झाला. संतोष यांच्या पत्नीनं आजारामुळे कंटाळून हे पाउल उचलल्याचं म्हटलं जात आहे. आईच्या वेदना बघू न शकल्याने  मुलीनेही तिच्यासोबतचं आत्महत्या केल्याचं म्हणणं समोर आल आहे.

संतोष यांच्या पत्नीचं नाव अस्मिता गुप्ता आणि   मुलीचं नाव सुष्टी गुप्ता  होतं. त्या दोघीनींही ५ एप्रिल रोजी आपल्या अंधेरीच्या घरी स्वतःला जाळून आत्महत्या केली. शेजाऱ्यांना ही गोष्ट समजताच  त्यांनी अग्निशमन दलाला बोलावलं. त्या दोघींनाही ताबडतोब कूपर हॉस्पिटलमध्ये  नेण्यात आल. परंतु हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच अस्मिता यांचा मृतू झाला होता. तर त्यांची मुलगी सृष्टी ७० टक्के भाजली होती. तिला ऐरोली येथील नॅशनल बर्न सेन्टर येथे हलवण्यात आलं. परंतु दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान  तिचाही मृत्यू झाला.

 

अस्मिताच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या होत्या. तसेच त्यांची आर्थिक परिस्थितीसुद्धा बेताची होती. सतत पोट दुखीचा त्रास तिला  होत होता. त्यामुळे नेहमी नैराश्यात राहून  त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊन उचलल.

संतोष गुप्ता यांच्या पत्नीच्या आणि मुलीच्या आत्महत्या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरु आहे. पोलिसांना  त्यांच्या मोबाईलमध्ये जी सुसाइड नोट सापडली आहे, त्यात त्यांनी आपल्या मृत्यूसाठी कोणीही  जबाबदार नाही असे सांगितले आहे. संतोष गुप्ता आणि त्यांच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता आणि दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत होते.

अस्मिता गुप्ता तिचा नवरा संतोष गुप्ता यांच्यापासून वेगळ्या का राहत होत्या, त्या दोघांनीही घटस्फोटासाठी अर्ज दाखल का केला होता. ह्या गोष्टींचा उलगडा अद्याप बाकी आहे.

संतोष गुप्ता यांनी बॉलिवूडमध्ये काही  सिनेमांच दिग्दर्शन केलं आहे. त्यामध्ये  त्यांनी ‘ फरार’, ‘ रोमी ‘, ‘ द हिरो ‘आणि ‘आज की औरत ‘ यासारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: