‘ तारक मेहता ‘ मधील बबिता म्हणाली, माझ्या शिक्षकाचा हात माझ्या अंडरपॅन्टमध्ये…….
‘तारक मेहता का उल्टा चश्मा ‘ मालिकेतील बबीता म्हणजेच मुनमुन दत्ता सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची सोशल मीडियावर कमी नाही. मात्र एक वेळ अशी होती जेव्हा ती लैगिक शोषणाची बळी झाली होती.समाजात अनेक मुली/ महिला लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या बातम्या पाहायला मिळतात.
काही वर्षापूर्वी #MeToo द्वारे अनेक महिलांनी आपले अनुभव शेअर केले होते तसेच अनेक अभिनेत्रींनी मोकळेपणाने आपले अनुभव शेअर केले.अनेकांनी आपल्या भूतकाळातील वाईट प्रसंग सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले. मुनमुन दत्ता हिनेदेखील तिच्या आयुष्यातील मोठा खुलासा केला होता.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा ‘ मधील फेमस अभिनेत्री बबिता म्हणजेच मुनमुन दत्ता तिच्या अक्टिंग बरोबरच तिच्या सुंदर्तेमुळे प्रचलित आहे. सोशिअल मिडीयावर सक्रीय असलेल्या मुनमुन दत्ता हिने स्वता:विषयी घडलेली लैंगिक शोषणा विषयीची घटना इंस्टाग्रामवर पोस्ट करत दुख: व्यक्त केल. त्यात तिने लिहिल होत की, अश्या वाईट आठवणी दूर करण्यासाठी महिला रडून तो वाईट प्रसंग दूर करण्याचा प्रयत्न करतात.
मुनमुन दत्ताने पोस्ट मध्ये लिहिलेलं की, माझ्या शेजारील काकांची नजर नेहमीच मला त्रास देत होती, मी कोणाला काही सांगू नये यासाठी त्यांनी मला धमकी दिल्याचा धक्कादायक प्रसंग घडला होता. याशिवाय माझा जन्म झाल्यानंतर माझा मोठा चुलत भाऊ मला रुग्णालयात पाहायला आला होता, त्यानंतर 13 वर्षांनी त्याने माझ्या शरीराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला.
तिने पुढे लिहिलं की, मला ट्यूशन शिकवणाऱ्या शिक्षकाचा हात माझ्या अंडरपॅन्टमध्ये होता. तसेच दुसरे शिक्षक ज्यांना आम्ही राखी बांधली ते शिक्षा म्हणून वेगवेगळ्या घाणेरड्या पद्धतीचा वापर करत असत. असे भयानक प्रसंग मुनमुन दत्ता हिने सोशिअल मेडीअवर शेअर केले.
मुनमुन दत्ता ने पुढे लिहिलं होतं की, त्या वयात तुम्हाला कळत नाही, ही गोष्ट आपल्या आई-वडिलांना कशी सांगावी.त्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो, जीव गुदमरतो, सगळ नकोनकोस वाटत पण समजत नसत कस आणि कोणाजवळ ह्या गोष्टी सांगाव्यात. त्यामुळे पुरुषांप्रती तुमचा राग अधिक वाढत जातो. कारण तुमच्या दृष्टीने ते गुन्हेगार असतात.
पुढे जाऊन ती बोलते की, ह्या गोष्टी आपल्या आजूबाजूला,आपल्या घरातही घडत असतात.तुमच्या घरात आई, बहिण,बाईको, मुली तसेच कामवाली यांच्या सोबतही घडत असतात. त्यांना विश्वासात घेऊन विचारून पहा त्यांचे अनुभव तुम्ही हैराण व्हाल.ती म्हणते की अश्या घाणेरड्या भावना दूर करण्यासाठी मला खूप वर्ष लागली.ती पुढे लिहिते की ही पोस्ट मी त्या महिलांसाठी लिहिली ज्या लैंगिक शोषणाला बळी पडल्या आहे.त्यांना या भयानक परिस्थितून बाहेर काढण्यासाठी एकजूट होणे गरजेचे आहे.
0 Comments: