सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य, पण...; राज ठाकरेंची उद्विग्न प्रतिक्रिया
मुंबई: नाशिकमधील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेनंतर आज विरार येथील कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता मनसे अध्यक्ष यांनी देखील या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच, सरकारला एक महत्त्वाचा सल्लाही दिला आहे. ( on in Virar) विरारमधील आगीच्या दुर्घटनेवर राज ठाकरे यांनी ट्वीट केलं आहे. 'आज विरारमधील हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला, परवा नाशिक मधली घटना असो की काही दिवसांपूर्वीची भंडारा आणि भांडुप मधील घटना असोत. ह्या घटना दुर्दैवी आणि क्लेशदायी आहेत. सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य, पण म्हणून ह्या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही असं नाही,' अशी उद्विग्नता राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. 'सरकारने तातडीने जबाबदार अधिकाऱ्यांच्या टीम्स तयार करून, प्रत्येक रुग्णालयातील व्यवस्थांचं, अग्निसुरक्षा यंत्रणांचं तात्काळ ऑडिट करून घ्यायला हवं. आणि ज्या त्रुटी आढळतील त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत,' असा सल्लाही त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून सरकारला दिला आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: